• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rohit Sharma Created History In The Adelaide Odi

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला

IND vs AUS: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलसोबत रोहित शर्माने भारतीय डावाची सुरुवात केली आणि पहिले चौकार मारताच त्याने एक मोठा टप्पा गाठला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 23, 2025 | 11:17 AM
Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० वनडे धावा करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय
  • पहिल्या ५ षटकांत टीम इंडियाची संथ सुरुवात
  • रोहित शर्माचे अर्धशतक
IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना अॅडलेड ओव्हलवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही, मात्र ऑस्ट्रेलियाने तीन बदल केले (जोश फिलिप, नॅथन एलिस आणि मॅथ्यू कुहनेमन यांच्या जागी अ‍ॅलेक्स केरी, झेवियर बार्टलेट आणि अ‍ॅडम झम्पा संघात).

रोहित शर्माने रचला इतिहास

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. सुरुवातीला सावध खेळ करणाऱ्या रोहितने तिसऱ्या षटकात शानदार चौकार मारला आणि याच फटक्याने त्याने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

  • विक्रम: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर १००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
  • पहिला भारतीय: यासह, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही हा पराक्रम साधता आला नाही.
🚨 HISTORY BY ROHIT SHARMA 🚨Rohit Sharma becomes the first Indian to score 1000 runs in Australia against Australia in ODI History. 🔥 1,000* – Rohit Sharma (21 Inns)
802 – Virat Kohli (19 Inns)
740 – Sachin Tendulkar (25 Inns)
684 – MS Dhoni (20 Inns)
517 – Shikhar Dhawan… pic.twitter.com/tTM1yWjpqK
— All Cricket Records (@Cric_records45) October 23, 2025

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडेमध्ये सर्वाधिक धावा

फलंदाज धावा
रोहित शर्मा १००६
विराट कोहली ८०२
सचिन तेंडुलकर ७४०
एमएस धोनी ६८४
शिखर धवन ५१७

विश्वविक्रम विव रिचर्ड्सच्या नावावर 

वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार विव रिचर्ड्स यांच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. रिचर्ड्स यांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० सामन्यांमध्ये १९०५ धावा केल्या. जर रोहित शर्मा त्याच्याइतकेच सामने खेळला तर तो हा विक्रम मोडू शकेल. तथापि, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला ३८ वर्षीय खेळाडू किती काळ खेळू शकतो हे पाहणे बाकी आहे.

सामन्यावर एक नजर

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. त्यांनी सातव्या षटकात शुभमन गिल (९) आणि विराट कोहली (०) यांना १७ धावांवर गमावले. रोहित शर्माला दुसऱ्या टोकावर श्रेयस अय्यरने साथ दिली. बातमी लिहपर्यंत भारताने २७ षटकांत दोन गडी गमावून ११७ धावा केल्या आहेत. रोहित ६३ आणि श्रेयस ४३ धावांवर खेळत आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवुड.

Web Title: Rohit sharma created history in the adelaide odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • IND VS AUS
  • Record
  • Rohit Sharma
  • Sports

संबंधित बातम्या

“दक्षिण आफ्रिकेला थेरपीची गरज…” एका पराभवाने जग बदललं! आफ्रिकन क्रिकेटच्या सर्वात मोठ्या चाहत्याने केले सत्य उघड
1

“दक्षिण आफ्रिकेला थेरपीची गरज…” एका पराभवाने जग बदललं! आफ्रिकन क्रिकेटच्या सर्वात मोठ्या चाहत्याने केले सत्य उघड

SA vs NZ : न्यूझीलंडचा नवीन रन मशीन कोण आहे Finn Allen? सेमीफायनलमध्ये विश्वविक्रमी खेळीनंतर नावावर केले अनेक विक्रम
2

SA vs NZ : न्यूझीलंडचा नवीन रन मशीन कोण आहे Finn Allen? सेमीफायनलमध्ये विश्वविक्रमी खेळीनंतर नावावर केले अनेक विक्रम

T20 World Cup 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? फिन अॅलनची एन्ट्री तर सूर्यकुमार यादव बाहेर
3

T20 World Cup 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? फिन अॅलनची एन्ट्री तर सूर्यकुमार यादव बाहेर

IND Vs ENG : अभिषेक शर्मा सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही?  कोच मोर्ने मोर्केल यांनी दिले संकेत, मग संजू सॅमसनचं काय?
4

IND Vs ENG : अभिषेक शर्मा सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? कोच मोर्ने मोर्केल यांनी दिले संकेत, मग संजू सॅमसनचं काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं;  राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

Mar 05, 2026 | 12:21 PM
US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

Mar 05, 2026 | 12:15 PM
Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन

Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन

Mar 05, 2026 | 12:13 PM
महाराष्ट्रातील नागरिक लवकरच परतणार मायदेशी; गिरीश महाजनांकडे सरकारने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

महाराष्ट्रातील नागरिक लवकरच परतणार मायदेशी; गिरीश महाजनांकडे सरकारने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Mar 05, 2026 | 12:13 PM
Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी

Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी

Mar 05, 2026 | 12:00 PM
Mumbai Real Estate: मुंबईत मोठ्या घरांची मागणी वाढली; ५ कोटींपेक्षा महागड्या घरांकडे खरेदीदारांचा कल

Mumbai Real Estate: मुंबईत मोठ्या घरांची मागणी वाढली; ५ कोटींपेक्षा महागड्या घरांकडे खरेदीदारांचा कल

Mar 05, 2026 | 11:57 AM
Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

Mar 05, 2026 | 11:56 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.