'डक'वर बाद होताच विराट कोहलीच्या कारकिर्दीला लागला 'हा' डाग! (Photo Credit- X)
IND vs AUS 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना अॅडेलमध्ये खेळवला जात आहे. भारतासाठी हा सामना कोर या मरो सारखा असणार आहे, कारण भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अश्यातच भारताने आजचा सामना नावावर केला नाही मालिकाहा गमवावी लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. पण भारतासाठी हे घातक ठरले. कारण टीम इंडियाने ५० धावांच्या आतच आपल्या दोन महत्तवाच्या विकेट गमावल्या. कर्णधार शुभमन गिल ९ आणि विराट कोहली ० वर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. मालिकेत सलग दुसऱ्यांदा विराट कोहली विना धावा बाद झाला. पर्थ वनडेमध्येही तो धावा काढण्यात अपयशी ठरला. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत पहिल्यांदाच विराट कोहली सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७,००० पेक्षा जास्त धावा आणि ८२ शतके करणाऱ्या विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा कलंक आहे.
VIRAT KOHLI GONE FOR HIS SECOND DUCK OF THE SERIES!#AUSvIND | #PlayoftheDay | @BKTtires pic.twitter.com/jqIdvMeX9T — cricket.com.au (@cricketcomau) October 23, 2025
अॅडलेड वनडेमध्ये, विराट कोहली झेवियर बार्टलेटने एलबीडब्ल्यू केला. तो फक्त चार चेंडू खेळू शकला. अशाप्रकारे, टीम इंडियाने सातव्या षटकात १७ धावांवर आपला दुसरा बळी गमावला. बार्टलेटने त्याच षटकात कर्णधार शुभमन गिललाही बाद केले. शुभमन गिल नऊ चेंडूत नऊ धावा काढून बाद झाला.
अॅडलेडमध्ये शुभमन गिलची विकेट पडताच, विराट कोहली मैदानात उतरला. चाहत्यांना कोहलीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती, कारण त्याला अॅडलेडमध्ये धावा काढायला आवडतात. तथापि, अॅडलेडमध्ये एकही धाव न घेता कोहली बाद झाला. तथापि, कोहली शून्यावर बाद झाल्यानंतरही, स्टेडियममधील चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांना स्टँडिंग ओवेशन दिले.