भारत विरुद्ध श्रीलंका : भारताचा संघ २७ जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारताचे श्रीलंकेविरुद्ध तीन T२० सामने आणि तीन एकदिवसीय सामने आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये भारताच्या संघाची अजुनपर्यत बीसीसीआयने घोषणा केली नाही. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना या श्रीलंका दौऱ्यावर संघामध्ये संधी मिळेल याकडे एकदा नजर टाकणार आहोत. १४ जुलै रोजी झालेल्या भारताचा झिम्बाम्ब्वे दौऱ्यामध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी ४-१ अशी मालिका जिंकली. यावेळी भारताच्या संघाचे नेतृत्व शुभमन गिलने केले होते. श्रीलंका दौऱ्यावर संघाचे नेतृत्व भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे असेल. त्याचबरोबर भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर असणार आहे.
बीसीसीआयने झिम्बाब्वेसाठी अतिशय तरुण संघ निवडला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचा कर्णधार होता. श्रीलंका दौऱ्यावरील T२० मालिकेसाठीचा संघ पूर्णपणे वेगळा असू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याचबरोबर ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजसारखे स्टार खेळाडूही पुनरागमन करू शकतात.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी भारताचा नवा मुख्य कोच गौतम गंभीर लवकरच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि इतरांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भारतीय संघाची घोषणा होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या T२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी या आठवड्यात संघ जाहीर केला जाईल.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.
रोहित, विराट आणि बुमराह यांना विश्रांती मिळाल्यास 15 सदस्यीय संभाव्य संघ – शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, के. यादव, मोहम्मद सिराज, खलील अहमद, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.