India Vs England 5th T20: अभिषेकची वादळी खेळी अन्...; टीम इंडियाकडून इंग्लंडचा 150 धावांनी धुव्वा
पुणे: भारत आणि इंग्लंड संघामध्ये सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू होती. त्यातील पाचवा सामना हा मुंबई येथे पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजचा पाचवा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने याआधीच मालिका खिशात घातली आहे. पाचव्या सामना जिंकून भारताने या मालिकेचा शेवट गोड केला आहे. भारताच्या फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही बाजूने इंग्लंडला धूळ चारली आहे.
5TH T20I. India Won by 150 Run(s) https://t.co/B13UlBNLvn #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 2, 2025
भारताने ही मालिका आधीच जिंकली होती. मात्र हा सामना मोठ्या धावांनी जिंकून या मालिकेचा शेवट गोड करण्यात आला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला 248 धावांचे आव्हान दिले होते. त्यामध्ये अभिषेक शर्माने तडाखेबंद खेळी केली. त्याने 54 चेंडूत 135 धावा केल्या. तर इंग्लंडला केवळ 97 धावाच करता आल्या. भारताच्या भेदक गोलंदाजांनी इंग्लंडला 97 वरच रोखले. आव्हान खरेतर कठीण होते. इंग्लंडची सुरुवात चांगली झालेली. मात्र त्यानंतर भेदक गोलंदाजीपूढे इंग्लंडच्या धडाधड विकेट पडत गेल्या.
हेही वाचा: Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माने इंग्लंडला धू-धू धुतला; 54 चेंडूत 135 धावांची वादळी खेळी
अभिषेक शर्माने इंग्लंडला धू-धू धुतला; 54 चेंडूत 135 धावांची वादळी खेळी
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तडाखेबंद शतक लगावले आहे. अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतकी खेळी केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अभिषेक शर्माचे वादळ घोंघावत होते. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजांना त्याने सेट होऊ दिले नाही. 118 व्या ओव्हरमध्ये शर्मा बाद झाला. त्याने 54 चेंडूत 135 धावा ठोकल्या.
अभिषेक शर्माने केवळ 37 चेंडूत शतक पूर्ण केले. 37 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकार लगावले. अभिषेक शर्माने या प्रकारे लगावलेले हे दुसरे शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात तिसरे वेगवान शतक आहे. याधी रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांनी याप्रकारे शतक लगावले आहे. भारताच्या संघासाठी पॉवरप्ले अत्यंत चांगला गेला. भारतीय संघाने 1 विकेट गमावून 95 धावा केल्या. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यात भागीदारी झाल्याचे दिसून आले. अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे.
टीम इंडियाने जिंकला दुसरा U-19 ‘वर्ल्ड कप’
भारताच्या महिला क्रिकेट अंडर 19 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला 83 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केले.
हेही वाचा: IND Vs SA Final: टीम इंडियाने जिंकला दुसरा U-19 ‘वर्ल्ड कप’; 9 विकेट्सनी उडवला ‘चोकर्स’चा धुव्वा
टीम इंडियाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप स्पर्धा जिंकला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मिडियाववर मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जात आहे. याधी 2023 मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाची उपकर्णधार सनिका चाळके हिने विजयी चौकार मारत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. दुसऱ्या विकेटसाठी भारताने 48 धावांची भागीदारी केली.