इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माचे वादळी शतक (फोटो- ट्विटर)
India Vs England 5th T20: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड असा 5 वा टी-20 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तडाखेबंद शतक लगावले आहे. अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतकी खेळी केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अभिषेक शर्माचे वादळ घोंघावत होते. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजांना त्याने सेट होऊ दिले नाही. 118 व्या ओव्हरमध्ये शर्मा बाद झाला. त्याने 54 चेंडूत 135 धावा ठोकल्या.
Hundred reasons to celebrate! 📸📸
Live ▶️ https://t.co/B13UlBNdFP#TeamIndia | #INDvENG | @idfcfirstbank pic.twitter.com/qQUC6EAOlh
— BCCI (@BCCI) February 2, 2025
अभिषेक शर्माने केवळ 37 चेंडूत शतक पूर्ण केले. 37 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकार लगावले. अभिषेक शर्माने या प्रकारे लगावलेले हे दुसरे शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात तिसरे वेगवान शतक आहे. याधी रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांनी याप्रकारे शतक लगावले आहे. भारताच्या संघासाठी पॉवरप्ले अत्यंत चांगला गेला. भारतीय संघाने 1 विकेट गमावून 95 धावा केल्या. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यात भागीदारी झाल्याचे दिसून आले. अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे.
वरुण चक्रवर्तीकडे इतिहास रचण्याची संधी
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याची T२० मालिका सुरु आहे. यामध्ये सातत्याने सामन्यांमध्ये कामगिरी करणारा गोलंदाज म्हणजेच वरुण चक्रवर्ती. वरूणने संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. पण त्याला चॅम्पियन ट्रॉफी २०२५ मधून वगळण्यात आले आहे त्यामुळे अनेकजण टीम इंडियाच्या निवडसमितीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आता वरुण चक्रवर्ती आणखी एक रेकॉर्ड नावावर करण्याच्या सीमारेषेवर आहे.
हेही वाचा: IND vs AUS : वरुण चक्रवर्तीकडे इतिहास रचण्याची संधी, या विश्वविक्रमापासून काही विकेट दूर
टीम इंडियाच्या नावावर नवा रेकॉर्ड
भारताच्या संघाने संघाने २०२४ मध्ये झालेल्या आयसीसी T२० विश्वचषकामध्ये टीम इंडियाने विश्वचषक नावावर केला आहे. त्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. पण भारताच्या संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मागील काही मालिकांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे.
भारतीय संघाने शुक्रवारी पुण्यात जोरदार पुनरागमन करत चौथ्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला. हा विजय सूर्यकुमार ब्रिगेडसाठी आनंदाचा होता कारण यासह भारताने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह भारताने घरच्या मैदानावर आपला विश्वविक्रम आणखी मजबूत केला आहे. भारताने घरच्या मैदानावर सलग १७वी T२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली. मेन इन ब्लूने अखेरची T२० आंतरराष्ट्रीय मालिका २०१८/१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात गमावली होती. तेव्हापासून भारत विजयाचे साम्राज्य राहिला आहे.
हेही वाचा: IND vs AUS : टीम इंडियाच्या नावावर नवा रेकॉर्ड, ठरला मायदेशात सर्वाधिक T20 मालिका जिंकणारा संघ
भारताचा सहज विजय
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर शुक्रवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव १९.४ षटकांत सर्वबाद १६६ धावांत आटोपला. यासह भारताने चालू मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.