फोटो सौजन्य - JIO Cinema
गौतम गंभीर : भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि मोठे खुलासे केले आहेत. श्रीलंका दौऱ्यामध्ये भारताच्या अनेक जुन्या खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर श्रीलंका दौऱ्यामध्ये T२० मालिकेसाठी हार्दिक पांड्याची निवड न करता सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त केला.
सध्या T२० फॉरमॅटसाठी सूर्यकुमार यादव हा कर्णधार असणार आहे. तो एकदिवसीय फॉरमॅटचा खेळाडू नाही असे प्रशिक्षक गौतम गंभीर याचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शुभमन गिल हा तीनही फॉरमॅटचा खेळाडू आहे असेही सांगण्यात आले. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत सूचित केले की सूर्या केवळ टी-20 मध्ये त्यांच्या योजनेचा भाग आहे. गौतम गंभीर म्हणाला, “रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या निवृत्तीमुळे आम्ही बदलातून जात आहोत. सूर्यकुमार हा एकदिवसीय योजनेचा भाग नाही. तो फक्त टी-20 खेळाडू आहे.”
भारताचे अनेक खेळाडू टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार आहेत. यामध्ये केएल राहुल, रिषभ पंत आणि मोहम्मद शामी यांना संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रीलंका दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. पण या अष्टपैलू खेळाडूला वगळण्यात आले आहे की विश्रांती देण्यात आली आहे? भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले की, रवींद्र जडेजाला वगळण्यात आलेले नाही, मात्र त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
भारताचा संघ २७ जुलैपासून श्रीलंका दौरवर असणार आहे. यावेळी भारताचा संघ पहिल्यांदा गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताचा संघ सामने खेळणार आहे. त्याचबरोबर श्रीलंका दौऱ्यामध्ये मोठे बदल देखील करण्यात आले आहेत.