Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी संघ ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला नाही. फक्त पीसीबी अध्यक्ष नक्वी यांना एकटेच मैदानात राहून लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 29, 2025 | 09:56 AM
Asia Cup 2025

Asia Cup 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय संघाचा दमदार विजय
  • निवृत्त पाकिस्तानी मेजर आदिल राजा यांचा संताप
  • सलमान आगाने उपविजेत्या संघाचा चेक फेकून दिला

भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करून आशिया कप 2025 चे विजेतेपद नवव्यांदा पटकावले. मात्र सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनपेक्षित वळण आले. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी नक्वी एका बाजूला उभे होते, तर भारतीय खेळाडू सुमारे 15 यार्ड अंतरावर थांबले होते. त्यांनी आपल्या जागांवरून हलण्यास नकार दिल्यामुळे समारंभ उशिरा पार पडला.

या प्रकारासंदर्भात निवृत्त पाकिस्तानी मेजर आदिल राजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर लिहिताना नमूद केले की, भारतीय संघाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हा मोठा अपमान आहे.  भारतीय संघाच्या या कृतीमुळे  थेट धक्का पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या प्रतिमेलाही बसला आहे.’ असं आदिल राजा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी संघ ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला नाही. फक्त पीसीबी अध्यक्ष नक्वी यांना एकटेच मैदानात राहून लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला. सुमारे ५५ मिनिटांनी जेव्हा पाकिस्तानी संघ बाहेर आला तेव्हा प्रेक्षकांनी “भारत, भारत!” अशी घोषणाबाजी केली.

अंतिम सामन्यापूर्वीच, भारतीय खेळाडू जिंकले तर नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत अशी अटकळ बांधली जात होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि त्यांच्या देशाचे गृहमंत्री असलेले नक्वी हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. भारतीय संघाने पाकिस्तानमधील कोणाशीही हस्तांदोलन न करण्याचे किंवा मैदानाबाहेर कोणत्याही संवादात सहभागी न होण्याचे धोरण स्वीकारल्यामुळेही पाकिस्तानच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले.

पाकिस्तानी खेळाडू सलमान आगाने उपविजेत्या संघाचा चेक फेकून दिला

दरम्यान,  संपूर्ण आशिया कपमध्ये पाकिस्तानचा संघ अस्वस्थ दिसत होता. भारताविरुद्धचा प्रत्येक सामना त्यांनी गमावला. पाकिस्तानी खेळाडूंनी आपला संयम गमावण्याचे हे एक कारण मानले जाते. त्यातच अंतिम सामन्यातही पाकिस्तानी संघाची चिडचिड दिसून आली. भारताकडून झालेला पराभव पचवू न शकल्याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने मिळालेला उपविजेत्या संघाचा चेक सार्वजनिक ठिकाणी फेकला.

सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात, आघा यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रतिनिधी अमिनुल इस्लाम यांच्याकडून उपविजेत्या संघाचा चेक घेतला,  पण मागे वळून त्यांनी तोच चेक जमिनीवर फेकून दिला.

Web Title: Ind vs pak indian team not accepting trophy is an insult to army chief asim munir adil raja furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • cricket marathi news
  • IND vs PAK Match
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs SL Asia Cup 2025 : सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर धावबाद होऊनही शनाका नाबाद? क्रिकेटचा हा अनोखा नियम तुम्हाला माहित आहे का?
1

IND vs SL Asia Cup 2025 : सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर धावबाद होऊनही शनाका नाबाद? क्रिकेटचा हा अनोखा नियम तुम्हाला माहित आहे का?

India vs Pakistan : भारताच्या संघ ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सज्ज! सूर्या मोठ्या सामन्यात संघात करेल दोन बदल, जाणून घ्या प्लेइंग 11
2

India vs Pakistan : भारताच्या संघ ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सज्ज! सूर्या मोठ्या सामन्यात संघात करेल दोन बदल, जाणून घ्या प्लेइंग 11

IND vs PAK :  ‘No Handshake’ वादानंतर मोहम्मद आमीरची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल! विराट कोहलीबद्दल का म्हटल असे…
3

IND vs PAK : ‘No Handshake’ वादानंतर मोहम्मद आमीरची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल! विराट कोहलीबद्दल का म्हटल असे…

India vs Pakistan : BCCI ने पाकिस्तानचं केलं तोंड बंद! No Handshake प्रकरणात दिलं प्रत्युत्तर, PCB गप्प
4

India vs Pakistan : BCCI ने पाकिस्तानचं केलं तोंड बंद! No Handshake प्रकरणात दिलं प्रत्युत्तर, PCB गप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.