फोटो सौजन्य - BCCI
चॅम्पियन ट्रॉफी : भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी (Champion Trophy 2025) पाकिस्तानमध्ये जाणार की नाही याची चर्चा आता वाढत चालली आहे. भारतीय खेळाडूंकडून त्याचबरोबर पाकिस्तानी प्लेयर्सकडून एकमेकांच्या विरोधात वक्तव्य केली जात आहेत. परंतु भारताचा संघ पाकिस्तानमध्ये जाणार आहे की नाही याची अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने किंवा आयसीसीने दिली नाही. टीम इंडिया पाकिस्तनला जाणार की नाही हा वाद आता चिघळत चालला आहे. परंतु आता या अडचणींवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची भेट घेऊ शकतात. हे दोघेही आयसीसीच्या एजीएमसाठी श्रीलंकेत असणार आहेत.
पीसीबीने चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे. यामध्ये भारताच्या संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. तर २ दिवसाआधी आयसीसीची बैठक पार पडली यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. परंतु अजुनपर्यत चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणताही कठोर निर्णय घेण्यात आलेला नाही. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार होणार की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आतापर्यंत दोन्ही देशांकडून अनेक विधाने समोर आली आहेत.
भारताचा संघ आशिया कपसाठी पाकिस्तनमध्ये गेली नव्हती, तेव्हा आशिया कपची स्पर्धा हायब्रीड मॉडेलप्रमाणे खेळवण्यात आली होती. त्यावेळी ते सामने श्रीलंका आणि दुबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या मॉडेलसह आयसीसी स्पर्धा होऊ शकते. बीसीसीआय लवकरच या स्पर्धेबाबत ठोस निर्णय घेऊ शकते. त्याचबरोबर बीसीसीआयने सुद्धा आयसीसीला पत्र पाठवले होते.
भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यासाठी २७ जुलैपासून जाणार आहे. यासाठी भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि तीन इंडियाचा नवा स्टाफ असणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्यासाठी T२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माचं कर्णधार असणार आहे.