Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG ODI Live: धर्मशाळेत पावसाने घातला खोळंबा, टॉसला विलंब; सामना रद्द होणार?

IND vs AFG Toss Delayed Due to rain: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना आज धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. परंतु, पावसामुळे नाणेफेकीसाठी विलंब होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 13, 2026 | 01:35 PM
photo- x

photo- x

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला वनडे
पावासाने घातला खोळंबा
टॉसला विलंब

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (१३ जून) धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर होणार आहे. पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार शुभमन गिल आणि हशमतुल्लाह शाहिदी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:०० वाजता मैदानात उतरणार होते. परंतु, धर्मशाळा येथे पाऊस पडत असल्याने, नियोजित वेळेनुसार नाणेफेक होऊ शकलेली नाही. धर्मशाळामध्ये पावसाचा जोर आता वाढला आहे. यामुळे, खेळपट्टी सध्या  कव्हर्सने झाकलेली आहे.

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता

शुभमन गिल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतात. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, ईशान किशन किंवा यशस्वी जैस्वाल यांना तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, तर केएल राहुल मधली फळी सांभाळू शकतो. नितीश कुमार रेड्डी यांना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. या मालिकेत विराट कोहली आणि हार्दिक पांड्या खेळताना दिसणार नाहीत. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.

🚨 Update from Dharamshala 🚨 Toss for the 1️⃣st #INDvAFG ODI has been delayed due to rain. Stay tuned for more updates ▶️ https://t.co/lCuohEZYAl#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/cMPZs6Kj8r — BCCI (@BCCI) June 13, 2026

पिच रिपोर्ट

धर्मशाळेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त मानली जाते. उंचावर असलेल्या या मैदानावर सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडूला चांगला बाउन्स आणि स्विंग मिळतो. त्यामुळे फलंदाजांना सुरुवातीला सावध खेळावे लागते. पण या मैदानावर मोठ्या धावा देखील झाल्या आहेत; मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोत्तम संघही येथे २०० पेक्षा कमी धावसंख्येवर गारद झाले आहेत. मात्र एकदा खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मोठे फटके खेळणे तुलनेने सोपे होते. त्यामुळे चाहत्यांना चुरशीच्या सामन्याची अपेक्षा आहे.

या मैदानावर खेळला गेलेला शेवटचा एकदिवसीय सामना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने मिळून एकूण ७७१ धावा केल्या होत्या. या मैदानावर पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या २७४ आहे, जे भारताने २०२३ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध केला होता.

हेड टू हेड

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत चार एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने तीन सामने जिंकले असून, एक सामना ड्रॉ राहिला आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, सेदिकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोती, एएम गझनफर, बिलाल सामी, दरविश अहमद शरीफ, फरिद अहमद शरीफ, फरिद अहमद रसोली.

IND vs AFG: शुभमन गिलसमोर इतिहास रचण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध फक्त ‘इतक्या’ धावांची गरज

Web Title: India vs afghanistan 1st odi live toss 2026 rain delay dharamshala pitch report squads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • BCCI India
  • IND vs AFG
  • indian cricket team

संबंधित बातम्या

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात
1

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
2

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

IND vs AFG  : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
3

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
4

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.