फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
IND vs AUS 1st Test 4th Day live Update : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पहिला कसोटी सामना सुरू आहे. आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटीची दुसऱ्या इनिंग्समध्ये ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू आहे. भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिनाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाने ४.२ ओव्हर खेळल्या आहेत यामध्ये त्यांनी १२ धावा करत तीन विकेट्स गमावले आहेत. आज भारताच्या संघाला आणखी सात विकेट्सची गरज आहे. यामध्ये आता भारताच्या कोणत्या गोलंदाजांची जादू चालेल आणि टीम इंडियाला विजय मिळवून देईल हे पाहणं मनोरंजक ठरेल. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवण्यास टीम इंडिया मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरेल.
25 Nov 2024 01:26 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बार्हताच्या संघाने २९५ धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
1ST Test. India Won by 295 Run(s) https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 25, 2024
25 Nov 2024 01:01 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाला यांच्यामध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाला फक्त विजयासाठी एक विकेटची गरज आहे. वॉशिंग्टन सुंदरने भारताच्या संघाला नववा विकेट मिळवून दिला आहे. वॉशिंग्टन सुंदरने नॅथन लिऑनने दाखवला बाहेरचा रस्ता.
1ST Test. WICKET! 53.6: Nathan Lyon 0(2) b Washington Sundar, Australia 227/9 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 25, 2024
25 Nov 2024 12:31 PM (IST)
मिचेल स्टार्कच्या नावाने भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने आठवा विकेट घेतला आहे. आता विजयासाठी भारताच्या संघाला फक्त दोन विकेट्सची गरज आहे.
25 Nov 2024 12:07 PM (IST)
सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०० धावांचा आकडा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी सध्या ॲलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क संघासाठी फलंदाजी करत आहेत. आतापर्यत ४८ ओव्हरचा खेळ झाला आहे, अजुनपर्यत ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवण्यासाठी ३२७ धावांची गरज आहे.
25 Nov 2024 11:44 AM (IST)
टीम इंडियाचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने मागील काही महिन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. आता त्याने भारताच्या संघाला सातवा विकेट मिळवून दिला आहे. मिचेल मार्शला बाद करून त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटीचा पहिला विकेट नावावर केला आहे.
25 Nov 2024 11:18 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात आज ट्रेव्हिडं हेडने टीम इंडियाची डोके दुःखी वाढवली होती. आता भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे आणि भारताच्या संघाला सहावा विकेट मिळवून दिला आहे. ट्रॅव्हिस हेडने संघासाठी ८९ धावांची खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर आता अलेक्स कॅरी फलंदाजीसाठी आला आहे.
1ST Test. WICKET! 38.5: Travis Head 89(101) ct Rishabh Pant b Jasprit Bumrah, Australia 161/6 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 25, 2024
25 Nov 2024 11:04 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या १५० धावा पूर्ण झाल्या आहेत. यांना अजुनपर्यत जिंकण्यासाठी ३८३ धावांची गरज आहे.
25 Nov 2024 09:57 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याचा आज चौथा दिन आहे. यामध्ये आजच्या सेशनमध्ये भारताच्या संघाने दोन विकेट घेतले आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाच विकेट्स गमावून १०४ धावा केल्या आहेत. आतापर्यत ३० ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये सध्या ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श फलंदाजी करत आहेत. ट्रॅव्हिस हेडने ६३ धावांची खेळी खेळली आहे तर मिचेल मार्शने पाच धावा केल्या आहेत.
Lunch on Day 4 of the 1st Test.
Australia 104/5, #TeamIndia need 5 wickets to win this Test.
Yet another another terrific session for India.
Scorecard - https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND pic.twitter.com/zj3MPhHJ1N
— BCCI (@BCCI) November 25, 2024
25 Nov 2024 09:51 AM (IST)
ऑस्ट्रेलियाचा अर्ध्या संघाला बाहेरचा रस्ता भारतीय गोलंदाजांनी दाखवला आहे. यामध्ये आता सध्या ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श संघासाठी फलंदाजी करत आहेत. दुसऱ्या इनिंगच्या ऑस्ट्रेलियाचे २९ ओव्हर झाल्या आहेत यामध्ये त्यांनी १०१ धावा केल्या आहेत या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ४३३ धावांची गरज आहे.
25 Nov 2024 09:37 AM (IST)
ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे पण कांगारू संघाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड अजूनही मैदानात टिकून आहे आणि त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ६४ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या आहेत.
25 Nov 2024 09:30 AM (IST)
भारताच्या हाती पाचवा विकेट लागला आहे. मोहम्मद सिराजने टीम इंडियाला पाचवा विकेट स्टीव्ह स्मिथचा विकेट मिळवून दिला. स्टीव्ह स्मिथने संघासाठी १७ धावा केल्या. आता फलंदाजीसाठी मिचेल मार्श मैदानात आला आहे.
25 Nov 2024 08:21 AM (IST)
ऑस्ट्रेलियाच्या संघाचे चार विकेट्स गमावल्यानंतर आता कांगारूंच्या संघासाठी फलंदाजीला स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड फलंदाजीला आले आहेत. या दोघांना लवकर भारताच्या फलंदाजांना बाद करावे लागणार आहे कारण हे दोन्ही फलंदाज टीम इंडियासाठी घातक ठरू शकतात.
25 Nov 2024 08:17 AM (IST)
मोहम्मद सिराजने येताच त्याचे काम सुरु केले आहे. त्याने उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. १० ओव्हरचा खेळ झाला आहे, यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघाने चार विकेट्स गमावून २३ धावा केल्या आहेत.