फोटो सौजन्य - Indian Cricket Team सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनलचा सामना : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सेमी फायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने त्यांचे तिन्ही लीग सामने जिंकले आहेत, भारताच्या संघाने पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंडच्या संघाला पराभूत केले आहे. तर ऑस्ट्रेलियाला फक्त एकच सामना पूर्णपणे खेळता आला, कांगारू संघाचे २ सामने पावसामुळे वाया गेले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवले. त्यानंतर, पुढील दोन सामने रद्द झाल्यामुळे संघाला १-१ गुण मिळाले. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत एकमेकांसमोर येण्यास सज्ज आहेत.
आता चॅम्पियन ट्रॉफीसाठी सेमीफायनलचे सामने ठरले आहे. सेमीफायनलमध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ खेळणार आहेत. यामध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये लाहोर येथे दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे, तर दुसरा सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना पाकिस्तानमध्ये होणार आहे, तर पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये खेळवला जाईल.
Bring it on 🇮🇳 ⚔️ 🇦🇺
India will face Australia in the first semi-final in Dubai on Tuesday. 🇮🇳🏆#INDvsAUS | #ChampionsTrophy pic.twitter.com/ZijBB9FlO0
— Indian Cricket Team (@incricketteam) March 2, 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकणार आहेत, याशिवाय JioHotstar वर सामन्याचे थेट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे, जिथे तुम्ही सामना मोफत पाहू शकता. या सामन्याला सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता होणार आहे, तर सामन्याचा नाणेफेक दुपारी २ वाजता होईल.
२०२३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवण्यात आला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते, अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत आमनेसामने आले आहेत. यावेळी रोहित आणि कंपनी ऑस्ट्रेलियासोबत जुने हिशेब चुकते करू इच्छितात.
कांगारू संघाचा सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ज्यामुळे कूपर कॉनोलीला आता संघात समाविष्ट करण्यात आले आहे. कूपरला प्रथम राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान शॉर्टला दुखापत झाली.