फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
अहान शर्माचा Video : भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी करून न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवले. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या कॅप्टन्सीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे एवढेच नव्हे तर त्याच्या कॅप्टन्सीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौस्तुक केले जात आहे. कालच्या सामन्यांमध्ये कॅप्टन रोहित शर्मा फलंदाजीमध्ये फेल झाला कारण तो फक्त संघासाठी १५ धावा करू शकला. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय स्टार विराट कोहलीची पत्नी, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा रोहित शर्माच्या मुलासोबत मजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रविवारी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शेवटचा लीग सामना खेळला जात होता. यादरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह तिचा मुलगा अहानसोबत उभी असल्याचे दिसून आले, त्यानंतर अनुष्का शर्माने अहानला हसवण्यासाठी त्याच्याशी बोलताना दिसली आणि एक मजेदार शैली दाखवली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Anushka Sharma with Junior Hitman (Ahaan Sharma) 🥹❤️
– Such a Cute video ❤️ pic.twitter.com/Rx1mE4rdtW
— Nikhil (@TheCric8Boy) March 2, 2025
अनुष्का शर्मा तिचा पती विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी दुबईला पोहोचली होती. कोहली गेल्या काही काळापासून वाईट काळातून जात होता, पण कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून तो फॉर्ममध्ये परतला. त्यानंतर कोहलीने १११ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तथापि, न्यूझीलंडविरुद्ध कोहलीची बॅट पुन्हा शांत राहिली आणि तो फक्त ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रविवारी विराट कोहलीच्या अपयशी कामगिरीनंतरही, भारतीय संघाने आपल्या फिरकी गोलंदाजांच्या बळावर न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवून स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साधली. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा संघ ४५.३ षटकांत २०५ धावांवर गारद झाला. भारतीय संघ अपराजित राहिला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
India vs New Zealand : सामन्यादरम्यान विराट कोहलीने धरलेअक्षर पटेलचे पाय, सोशल मीडियावर Video Viral
भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना ४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाने फायनलच्या सामन्यांमध्ये हरवले होते तर T२० विश्वचषकामध्ये भारताने बदल घेतला होता. आता पुन्हा भारतीय संघाचे कट्टर प्रतिस्पर्धी ४ मार्च रोजी आमनेसामने असणार आहेत. दुसरा सेमीफायनलचा सामना लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत.