Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Brazil: पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर भारताची कोंडी! ब्राझीलने टीम इंडियाचा 4-0 ने केला गेम ओव्हर

Brazil Beat India by 4-0 in Football: भारत आणि ब्राझील यांच्यात शनिवारी कोलकाता येथे एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळला गेला. या सामन्यात ब्राझीलने भारताचा ४-० असा पराभव केला. ब्राझीलच्या खेळाडूंनी भारतावर सहज विजय मिळवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 04, 2026 | 03:08 PM
Brazil Beat India by 4-0 in Football

Brazil Beat India by 4-0 in Football

Follow Us
Follow Us:
  • ब्राझीलचा सुपर अटॅक
  • भारताची डिफेन्सफळी हादरली
  • टीम इंडियाचा ४-०ने दारुण पराभव
India Vs Brazil: भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ आणि ब्राझील पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ यांच्यात ३ ऑक्टोबर रोजी एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळला गेला. हा सामनाकोलकाता येथील सॉल्ट लेकमधील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर (VYBK) सामना खेळला गेला. या सामन्यात ब्राझीलने भारताला ४-० मने पराभव करत एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही आणि अखेरीस ब्राझीलने बाजी मारली. या सामन्यात ब्राझील आक्रमकपणे खेळला. पाच वेळच्या विश्वविजेत्या संघासमोर भारतीय संघाचे खेळाडू हतबल झाले. भारतीय संघ जागतिक फुटबॉल क्रमवारीत १३८ व्या स्थानावर आहे.

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक

ब्राझीलची उत्कृष्ट कामगिरी

भारत आणि ब्राझील पहिल्यांदाच फुटबॉल सामन्यात आमनेसामने आले. मात्र, ब्राझीलच्या संघाने आपल्या खेळातून भारतीय खेळाडूंना दाखवून दिले की ते पाच वेळा विश्वविजेते का आहेत. ब्राझीलने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. युवा ब्राझिलियन स्टार एस्तेवाओने एका शानदार शॉटने सामन्यातील पहिला गोल करून ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. एस्तेवाओने ब्राझीलचा पहिला गोल २८ व्या मिनिटाला केला.यानंतर भारतीय खेळाडूंनी ब्राझीलविरुद्ध काही काळ चांगला खेळ केला. पण ४२ व्या मिनिटाला ब्राझीलने आपला दुसरा गोल करून २-० अशी आघाडी घेतली. यावेळी ब्राझीलकडून पेद्रोने गोल केला. मध्यंतरापर्यंत ब्राझील २-० ने आघाडीवर होते.

भारत आणि ब्राझीलने संघात केले बदल

त्यानंतर भारत आणि ब्राझीलने आपापल्या संघात बदल केले. भारताने जमील संधूला वगळून त्याच्या जागी प्रभसुखन गिलला ब्राझीलविरुद्ध खेळण्याची संधी दिली. इतकेच नाही, तर मोहम्मद सन्नान आणि आकाश मिश्रा यांच्या जागी आशिक कुरूनियान आणि जय गुप्ता यांनाही संघात स्थान देण्यात आले. दरम्यान, आर्थर डायस, मॅथ्युसिन्हो, गॅब्रिएल बोंटेम्पो, व्हिनिसियस ज्युनियर आणि डग्लस सँटोस यांना ब्राझीलच्या संघातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी गॅब्रिएल, वँडरसन, डग्लस लुईझ, सॅम्युअल लिनो आणि ब्रुनो गिमारेस यांना संघात घेण्यात आले.

मध्यंतरानंतर, सॅम्युएल लिनोने ब्राझीलसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आणि ५७ व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. यानंतर, भारतीय संघाने ब्राझीलच्या खेळाडूंना बराच काळ रोखून धरले आणि त्यांना गोल करण्यापासून रोखले. मात्र, ९४ व्या मिनिटाला सॅम्युएल लिनोने ब्राझीलसाठी गोल करून ४-० असा विजय निश्चित केला. ब्राझील सध्या जगात सहाव्या क्रमांकावर आहे, तर भारत १३८ व्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांच्या क्रमवारीत खूप मोठा फरक आहे.

गोल्डन फिनिश! क्रिकेट, हॉकी, अन् तिरंदाजीत जलवा! शेवटच्या दिवशी जिंकली ५ सुवर्णपदकं; Asian Games 2026 मध्ये भारत कितव्या स्थानी?

Web Title: India vs brazil football brazil beat india 4 0 in kolkata friendly match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Brazil
  • Football
  • Indian Football Team

संबंधित बातम्या

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली
1

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय
2

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.