Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात

IND vs PAK: ढाका येथील नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव करून विक्रमी १०व्यांदा विजेतेपद पटकावले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 17, 2026 | 10:46 PM
भारताने केला विक्रम, १०व्यांदा जिंकली SAFF Championship (फोटो सौजन्य - X.com)

भारताने केला विक्रम, १०व्यांदा जिंकली SAFF Championship (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • भारताने चारली पाकिस्तानला धूळ 
  • गर्वाचे घर केले खाली 
  • ०-१ ने मागे असतानाही २-१ ने विजय केला प्राप्त 
IND vs PAK: भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानला निर्णायक फरकाने पराभूत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा देशाला गौरव मिळवून दिला आहे. बांगलादेशातील ढाका येथील नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिपच्या (SAFF चॅम्पियनशिप) रोमांचक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला २-१ ने पराभूत करून एक ऐतिहासिक विजय नोंदवला. या प्रभावी विजयासह, भारताने विक्रमी १०व्यांदा SAFF चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे. सुरूवातील भारत पिछाडीवर होता. मात्र आपल्या प्रभावी खेळाने भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकून घेतली. 

पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय युवा ब्रिगेडचे वादळी पुनरागमन

THE CHAMPIONSHIP WINNING MOMEMT! 🏆🥹 – India beats Pakistan 2-1 in the Finals to win SAFF Championship for the 10th time! https://t.co/S7BxUC2zIR — The Khel India (@TheKhelIndia) November 17, 2026

या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने आपला दुय्यम युवा संघ मैदानात उतरवला होता, परंतु भारतीय खेळाडूंपुढे पाकिस्तानचा जोश रोखता आला नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने आघाडी घेतली आणि भारत एका गोलने मागे होता.

मात्र, मध्यंतरानंतर भारतीय संघाने जोरदार आक्रमण केले आणि पाकिस्तानी बचावाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी आक्रमणांची मालिका सुरू केली, दोन शानदार गोल केले आणि सामन्याचे चित्रच पालटून टाकले. भारताने अंतिम शिट्टी वाजेपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली आणि पाकिस्तानच्या विजेतेपदाच्या आशा धुळीस मिळवल्या.

भारतासमोर कतारचे आव्हान, भारताच्या नवीन कर्णधाराने चाहत्यांकडून मागितला पाठिंबा

भारताने विक्रम केला प्रस्थापित 

INDIa ARE BACK IN THE GAME!!!!!! 🤩🔥 SUHAIL BHAT SCORES THE EQUALISER! 🇮🇳 India 1-1 Pakistan 🇵🇰 in SAFF Final https://t.co/HHlDqMh1lw — The Khel India (@TheKhelIndia) November 17, 2026

स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनून भारताने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. दहाव्यांदा सॅफ चॅम्पियनशिप जिंकून, भारतीय फुटबॉल संघाने या प्रतिष्ठित स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असण्याचा आपला विक्रम आणखी मजबूत केला आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मिळवलेल्या या संस्मरणीय विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि सोशल मीडियावर चाहते भारतीय संघाच्या उल्लेखनीय पुनरागमनाचे कौतुक करत आहेत. सॅफ चॅम्पियनशिप दहा वेळा जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

सुनील छेत्रीचा फुटबॉलला भावूक होत अलविदा, कुवैत विरूद्ध मॅच ड्रॉ

💡

Frequently Asked Questions

  • Que: सॅफ चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला किती गोलांनी हरवले?

    Ans: ढाका येथील नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानला ३-२ ने हरवून भारताने आपल्या सॅफ चॅम्पियनशिप २०२६ मोहिमेची सुरुवात विजयाने केली. भारताने पहिल्या हाफमध्ये ३-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने इंज्युरी टाइममध्ये दोन गोल केले, परंतु भारतीय संघाने आपली आघाडी कायम राखली

  • Que: सॅफ चॅम्पियनशिप कुठे खेळली गेली

    Ans: बांगलादेशमधील ढाका येथे हा सामना खेळविण्यात आला

  • Que: भारताला ही चॅम्पियनशिप किती वेळा मिळाली आहे?

    Ans: भारताला सॅफ चॅम्पियनशिप १०व्यांदा मिळाली आहे

Web Title: Ind vs pak indian football team beats pakistan in 10th saff championship final dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:46 PM

Topics:  

  • Football
  • IND VS PAK
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

IND Vs PAK: पाकिस्तान सावधान! India A चे ‘हे’ स्फोटक खेळाडू भिडण्यासाठी सज्ज; कधी होणार सामना?
1

IND Vs PAK: पाकिस्तान सावधान! India A चे ‘हे’ स्फोटक खेळाडू भिडण्यासाठी सज्ज; कधी होणार सामना?

U-19 Asia Cup: ‘Aggression दाखवा, मला आवडलं’, भारतीय संघाची शोएब अख्तरने थोपटली पाठ, केले मोठे विधान
2

U-19 Asia Cup: ‘Aggression दाखवा, मला आवडलं’, भारतीय संघाची शोएब अख्तरने थोपटली पाठ, केले मोठे विधान

पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज्‌ संघाने थेट…
3

पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज्‌ संघाने थेट…

‘क्रीजवर असताना मी फक्त…’; IND Vs PAK U-19 फायनल जिंकल्यावर मोहित उलवाने दिली प्रतिक्रिया
4

‘क्रीजवर असताना मी फक्त…’; IND Vs PAK U-19 फायनल जिंकल्यावर मोहित उलवाने दिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.