फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लड एकदिवसीय मालिका : टीम इंडियाचा चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका लवकरच सुरू होणार आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा वनडे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यापूर्वी, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडचा ४-१ असा पराभव केला होता. यामध्ये टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली आहे.
आता भारताचे क्रिकेट चाहते हे भारताचा संघ एकदिवसीय मालिकेमध्ये देखील अशीच कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा आहे. आता चाहते एकदिवसीय मालिकेची वाट पाहत आहेत, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जे खेळाडू सहभागी होणार आहेत. तेच खेळाडू चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी युएईला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही मालिका सराव सिरीज असणार आहे त्याचबरोबर महत्वाची असणार आहे.
U19 Women’s T20 World Champion होताच महिला युवा खेळाडू झाल्या मालामाल, वाचा किती मिळणार बक्षीस रक्कम
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना ६ फेब्रुवारीला नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू नागपुरात दाखल झाले आहेत. याशिवाय दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. तिसरा आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून खेळवले जाणार आहेत.
पहिला एकदिवसीय – गुरुवार ६ फेब्रुवारी – नागपुर
दुसरी वनडे – रविवार ९ फेब्रुवारी – कटक
तिसरी वनडे – बुधवार १२ फेब्रुवारी – अहमदाबाद
नोंद : सर्व सामन्यांची वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० आहे. नाणेफेक १ वाजता होणार आहे.
Bangladesh Premier League मध्ये आणखी एक लाजिरवाणा प्रकार, बस चालकाची दादागिरी, परदेशी खेळाडू अडकले
जर आपण भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेच्या लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टबद्दल बोललो, तर तुम्ही या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर नाही तर Hotstar ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल. त्याच वेळी, तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल. तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये भाष्य ऐकायला मिळेल.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (विकेटकिप) आणि रवींद्र जडेजा.