
IND vs NZ ODI Series: This record is beckoning the 'Hitman'! Rohit Sharma has the opportunity to surpass Ganguly, Azharuddin, and Sehwag.
IND vs NZ, Rohit Sharma has a chance to break a record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. ११ जानेवारी रोजी वडोदरा येथून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माला विक्रम रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतके झळकावणारा रोहित या मालिकेत देखील शतक झळकवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. यासह, रोहित शर्मा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन तसेच माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीमध्ये रोहित शर्माचा क्रमांक सहा आहे. तो सचिन तेंडुलकर, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुलीच्या मागे आहे. एकदिवसीय क्रिकेट स्वरूपात किवींविरुद्ध १,००० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितचा समावेश आहे. जर रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेमध्ये ८५ धावा केल्या तर तो किवींविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेईल.
रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध ३१ एकदिवसीय सामन्यांच्या २९ डावांमध्ये ३८.३२ च्या सरासरीने १०७३ धावा फटकावल्या आहेत. या काळात त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके लागावळी आहेत. सेहवागने त्याच सामन्यांच्या २३ डावांमध्ये ५२.५९ च्या सरासरीने ११५७ धावा काढल्या आहेत. सेहवागने किवींविरुद्ध ६ शतके आणि ३ अर्धशतके झळकवली आहेत. तर मोहम्मद अझरुद्दीनने ४० सामन्यांच्या ३९ डावांमध्ये ३६.०६ च्या सरासरीने १११८ धावा केल्या आहेत. सौरव गांगुलीने ३२ सामन्यांच्या ३१ डावांमध्ये ३५.९६ च्या सरासरीने १०७९ धावा काढल्या आहेत. या तिघांना मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला आणखी ८५ धावांची आवश्यकता असणार आहे.
हेही वाचा : नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामने खेळलेल्या भारताच्या विक्रमाचा विचार केला तर, भारतीय संघाचा दबदबा दिसून येत आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत १२० एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने ६२ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ५२ सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आहे. यातील एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर सात सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.