वॉशिंग्टन सुंदरची महत्त्वाची अर्धशतकी खेळी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या. पहिल्या डावात भारताच्या 4 विकेट्स वगळता संपूर्ण इंग्लंड संघ सर्वबाद झाला. यानंतर, दुसऱ्या डावातही भारताने 2 विकेट्स गमावल्या. ओव्हल येथे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि तिसऱ्या दिवशीचा हा खेळ प्रचंड रंगल्याचे दिसून आले आहे.
टेस्ट मॅचमध्ये One Day मॅचची मजा भारतीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने मिळवून दिलेली पहायला मिळाली आहे. भारताला गरज असताना त्याची ही अर्धशतकी खेळी खूपच महत्त्वाची मानली जात आहे. 10 व्या विकेट्ससाठी सुंदर आणि प्रसिद्ध यांनी चांगली भागीदारी करत भारताचा डाव सावरला. इंग्लंडला 374 धावांचे आव्हान भारताने दिले आहे.
ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील पाचव्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, इंग्लंडने भारताने दिलेल्या ३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आहे. बेन डकेट आणि जॅक क्रॉली ही सलामी जोडी क्रीजवर आहे. भारताकडे ही मॅच जिंकण्याची चांगली संधी आहे आणि आता सर्व लक्ष हे बॉलर्सवर लागले आहे.
टीम इंडिया ३९६ धावांवर ऑलआउट झाली. प्रसिद्धने शानदार फलंदाजी केली. इंग्लंडला जिंकण्यासाठी ३७४ धावा कराव्या लागतील. आता गोलंदाजांना त्यांचे काम करावे लागेल. प्रसिद्धने पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी कनेक्शन बरोबर नव्हते. जोश टंगने पाच विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा ४६ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५३ धावा काढून बाद झाला.
IND vs ENG 5th Test : शुभमन गिलची गाडी सुसाट! ओव्हल येथे रचला इतिहास; मोडला ग्राहम गूचचा विक्रम
भारताची कामगिरी
यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या आणि त्यानंतर आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य दिले. तिसऱ्या दिवशी, सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नाईटवॉचमन म्हणून आलेल्या आकाश दीप यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
आकाश दीप ९४ चेंडूत १२ चौकारांसह ६६ धावा काढल्यानंतर बाद झाला. त्याच वेळी, जयस्वालने १६४ चेंडूत ११८ धावांची खेळी केली. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि दोन षटकार आले. या मालिकेत भारतासाठी अपयशी ठरलेल्या खालच्या फळीने या सामन्यात काही महत्त्वाच्या भागीदारी केल्या आणि जलद धावा काढल्या. जडेजाने ५३, जुरेलने ३४ आणि सुंदरने ५३ धावा केल्या. इंग्लंडकडून जोश टँगने पाच बळी घेतले.
ENG vs IND : भारतासाठी नाईट वॉचमॅन ठरला तारणहार! Akash Deep चे तगडे अर्धशतक..