
फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया
India vs Malaysia Live Streaming : भारताच्या अंडर 19 संघाने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा आज सामना हा मलेशिया विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना दुबईमध्ये होणार आहे. आज भारतीय संघाचा शेवटचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने यूएईला पराभूत केले होते. एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात यूएईचा २३४ धावांनी पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने एका रोमांचक सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ९० धावांनी पराभव केला. सलग दोन विजयांसह, भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता, ग्रुप अ मध्ये, मेन इन ब्लू संघ मलेशियाशी सामना करेल. या परिस्थितीत, भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साकारण्यासाठी प्रयत्नशील असेल.
शिवाय, चाहत्यांना पुन्हा एकदा युवा सेन्सेशन वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. वैभवने युएईविरुद्ध १७१ धावा केल्या. तथापि, पाकिस्तानविरुद्ध तो फक्त १० धावा करू शकला. तर, भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते जाणून घेऊया. तसेच, आपण हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कसा पाहू शकतो?
भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना हा 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना दुबईतील सेव्हन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला सुरुवात 10.30 मिनिटांनी होणार आहे. तर या सामन्याचे नाणेफेक हे 10 वाजता होणार आहे.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत अंडर-१९ आणि मलेशिया अंडर-१९ यांच्यातील आशिया कप सामना पाहू शकता. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग ही तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहु शकता. पण तुम्हाला या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी सबस्क्रिबशन असण्याची गरज आहे.
Three semi-finalists have been locked in and the final spot will be decided tomorrow! The battle for Asian supremacy is well and truly heating up 🫡#DPWorldMensU19AsiaCup2025 #ACC pic.twitter.com/THGdrorKFf — AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 15, 2025
अजीब वाजदी, मोहम्मद हेरील (विकेटकिपर), मोहम्मद हरिझ अफनान, डेझ पात्रो (कर्णधार), मोहम्मद अलिफ, मोहम्मद अक्रम, हमजा पांगी, मोहम्मद फतुल मुइन, एन सथानकुमारन, जश्विन कृष्णमूर्ती, मोहम्मद नूरहानिफ, स्याकिर इज्जुद्दीन, अहमद तरमिमी, चे जमान, मोहम्मद अफनिद.
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, युवराज गोहिल, उद्धव मोहन, नमन हरणपा, नमन पश्चिया, पानश कुमार सिंह.