फोटो सौजन्य - KFC Big Bash League सोशल मिडिया
Shaheen Afridi earned respect at the international level : जगात पाकिस्तानला सतत अपमान सहन करावा लागतो. आणि त्यांचे खेळाडूही बोट दाखवण्यास तत्पर असतात. आता, बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार शाहिद आफ्रिदीला गंभीर अपमानित करण्यात आले आहे. त्याला षटकाच्या मध्यभागी थांबवण्यात आले आणि नंतर, पंचांनी त्याला षटक पूर्ण करण्यापासून रोखले.
ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग सुरू झाली आहे. आज, सोमवारी, मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात दुसरा सामना खेळला गेला. शाहीन आफ्रिदी ब्रिस्बेन हीटकडून गोलंदाजी करत होता. या षटकात त्याने दोन बीमर टाकले. त्याने त्याच्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर बीमर टाकले. जर गोलंदाजाने एका षटकात दोन बीमर टाकले तर पंच त्याला ओव्हर पूर्ण करण्यापासून रोखू शकतो. आफ्रिदीसोबत असेच घडले. त्याने एका षटकात दोन बीमर टाकले. पंचांनी त्याला सहज बाद केले.
या सामन्यात शाहीन आफ्रिदीने खूप धावा दिल्या. त्याने २.४ षटके टाकली आणि एकही विकेट घेतली नाही. त्याने १६.१२ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. आफ्रिदी त्याच्या गोलंदाजीने फारसा प्रभाव पाडू शकला नाही, ज्यामुळे संघाचा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न रेनेगेड्सने २० षटकांत ५ गडी गमावून २१२ धावा केल्या. टिम सेफर्टने ५६ चेंडूत १०२ धावा केल्या, तर ऑलिव्हर पिके ५७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटला २० षटकांत ८ बाद १९८ धावाच करता आल्या. अखेर मेलबर्नने १४ धावांनी सामना जिंकला.
खरं तर, या षटकात शाहीनने दोन कंबरेपर्यंत उंच फुल-टॉस टाकले आणि पंचांनी त्याबद्दल त्याच्या कर्णधाराकडे तक्रार केली, नंतर शाहीनला फटकारले आणि त्याला गोलंदाजीपासून वंचित ठेवले. मेलबर्न रेनेगेड्सच्या डावातील हे १८ वे षटक होते. शाहीनने फुल-टॉस टाकला. फलंदाजी करणाऱ्या डावखुऱ्या फलंदाज ऑलिव्हर पीकने कसा तरी स्वतःला वाचवण्यात यश मिळवले. यष्टीरक्षकालाही चेंडू रोखण्यात अपयश आले आणि फलंदाजांनी दोन धावा घेतल्या. आफ्रिदीने माफी मागितली पण मैदानावरील पंचांनी त्याचा कर्णधार नॅथन मॅकस्विनीशी बोलून शाहीनला गोलंदाजीपासून दूर केले.
Wow. On his BBL debut, Shaheen Afridi has been removed from the attack! #BBL15 pic.twitter.com/IhDLsKFfJi — KFC Big Bash League (@BBL) December 15, 2025
या सामन्यात मेलबर्नचा सलामीवीर टिम सेफर्टने शानदार शतक झळकावले. त्याने ५६ चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांसह १०२ धावा केल्या. ऑलिव्हर पीकनेही २९ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ५७ धावा केल्या. या खेळींमुळे मेलबर्नने पाच बाद २१२ धावा केल्या.






