भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक 2023 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. आजचा हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअम एकही सीट रिकामी दिसणार नाही. त्याचबरोबर भारताचा फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही विश्वचषक २०२३ चा १२ वा सामना पाहण्यासाठी पोहोचली आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शनिवारी सकाळी अहमदाबाद विमानतळावर दिसली. अनुष्का याआधीही अनेक प्रसंगी टीम इंडियाला सपोर्ट करायला आली आहे. सोशल मीडियावर अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
अनुष्का शर्मा अहमदाबादला पोहोचली आहे ती आधी हॉटेलमध्ये जाणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजचा सामना पाहण्यासाठी जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यामुळे संपूर्ण शहर चाहत्यांनी फुलून गेले आहे. हा सामना पाहण्यासाठी अनुष्कासोबत इतर बॉलिवूड स्टार्सही येणार आहेत. अनुष्का विमानतळाबाहेर पडली तेव्हा रस्त्यावर अनेक वाहने आणि लोक होते. याच कारणामुळे ती मॅचच्या खूप आधी अहमदाबादला पोहोचली. उल्लेखनीय आहे की याआधीही अनुष्का टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. मात्र यामुळे तिला ट्रोलही करण्यात आले आहे. टीम इंडियाच्या हरलेल्या सामन्यांमुळे अनुष्का ट्रोल झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग दरम्यान अनुष्का अनेकदा सामने पाहायला जात असे.