Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colombo Weather: कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता, कसे राहील तासातासाला हवामान

Colombo Weather: भारत विरूद्ध श्रीलंकेदरम्यान कोलंबोमध्ये दुसरा कसोटी क्रिकेट सामना खेळला जात असून दुसर्या दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कसे असणार हवामान जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 24, 2026 | 10:35 AM
दुसऱ्या दिवशी सामन्यावर पावसाचे सावट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

दुसऱ्या दिवशी सामन्यावर पावसाचे सावट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना 
  • दुसऱ्या दिवशीच्या खेळावर पावसाचे सावट
  • कसे राहणार दिवसभर हवामान, जाणून घ्या 
Colombo Weather: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे कोणतीही अडचण आली नाही. पहिल्या दिवशी टीम इंडियाने ३०० चा टप्पा गाठला. दरम्यान दिवसभरात ५ विकेट्सही गमावल्या. हा सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळला जात आहे. गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी कोलंबोमधील हवामान पूर्णपणे निरभ्र होते, परंतु दुसऱ्या दिवशी तशी अपेक्षा नाही.

IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

कोलंबोमधील आजचे हवामान

आज, सोमवारी, कोलंबोमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तथापि, सकाळी हवामान निरभ्र असेल असंही सांगण्यात आले आहे. सामना सकाळी १० वाजता सुरू झाला असून, AccuWeather नुसार, त्यावेळी पावसाची शक्यता ६६ टक्के आहे. दुपारपर्यंत पावसाची शक्यता सुमारे ५० टक्के आहे. संध्याकाळीही पावसाचा अंदाज आहे. सोमवारी कोलंबोमध्ये तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

IND vs SL 2nd Test: ‘देवदत्त’ने वाचवला भारताचा डाव! पडिक्कलने पहिल्याच दिवशी पेटवली लंका; गिलनेही गाजवलं मैदान, भारत ३०० पार

कोलंबोमधील तासागणिक हवामान अपडेट्स

वेळ तापमान पावसाची शक्यता हवामान
10:00 AM 28°C 66% पाऊस पडण्याची शक्यता
11:00 AM 29°C 49% ढगाळ वातावरण
12:00 PM 31°C 49% ढगाळ वातावरण
01:00 PM 30°C 55% पाऊस पडण्याची शक्यता
02:00 PM 30°C 51% पाऊस पडण्याची शक्यता
03:00 PM 30°C 49% ढगाळ वातावरण
04:00 PM 30°C 43% ढगाळ वातावरण
05:00 PM 29°C 47% ढगाळ वातावरण
06:00 PM 29°C 51% पाऊस पडण्याची शक्यता

भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ 

कोलंबोमध्ये पहिल्या दिवशी, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपताना पाच गडी गमावून ३०० धावा केल्या. पडिक्कलने दोनदा जीवदान मिळाल्याचा फायदा घेत, १२ चौकारांसह १९३ चेंडूंमध्ये ११७ धावा केल्या. 

देवदत्तने कर्णधार शुभमन गिल (५०) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची आणि रवींद्र जडेजा (४३ धावा, ८३ चेंडू, चार चौकार) सोबत चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही ४५ धावांची उपयुक्त खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल सात धावांवर, तर सारांश जैन चार धावांवर होता. ऋषभ पंतला लागल्यामुळे तो रिटायर्ट हर्ट होऊन तंबूत परतला होता. 

Web Title: India vs sri lanka 2nd test 2nd day in colombo weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test cricket

संबंधित बातम्या

W W W  तीन चेंडूंवर तीन विकेट्स! Hasan Mahmud ची ऐतिहासिक हॅट्ट्रिक; अशी कामगिरी करणारा बांग्लादेशचा पहिला वेगवान गोलंदाज
1

W W W तीन चेंडूंवर तीन विकेट्स! Hasan Mahmud ची ऐतिहासिक हॅट्ट्रिक; अशी कामगिरी करणारा बांग्लादेशचा पहिला वेगवान गोलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.