IND vs SL 2nd Test Day 1 Score
भारताची सुरुवात चांगली नव्हती. राहुलच्या रूपाने ३७ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. तो लहिरा कुमारच्या गोलंदाजीवर १८ धावांवर बाद झाला. भारताला दुसरा धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला, जो फर्नांडोच्या गोलंदाजीवर ४५ (५३) धावांवर बाद झाला. दोन्ही फलंदाज पहिल्या सत्रातच बाद झाले. लंच ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यावर देवदत्त पडिक्कलने अर्धशतक झळकावले. शुभमन गिलनेही अर्धशतक केले. मात्र, टी-ब्रेकच्या काही वेळ आधी, ५० धावांवर असताना गिलने असिथा फर्नांडोच्या वाईड स्विंग चेंडूवर चुकीचा फटका मारला आणि बाद झाला. टी- ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाला. मनगटाच्या दुखापतीमुळे ऋषभ पंत तीन धावांवर खेळत असताना रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी जडेजा फलंदाजीसाठी आला.
देवदत्त पडिक्कलने या मालिकेतील आणि आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने मागील सामन्यात पहिल्या डावात शतक केले होते आणि या सामन्यातही पहिल्या डावात शतक केले आहे. देवदत्तने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार खेळी केली. तो ११७ धावांवर बाद झाला. भारतीय संघातील निम्मे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. जडेजा ४३ धावांवर बाद झाला. ध्रुव जुराईल ७ धावांवर, तर पदार्पण करणारा सारांश जैन ४ धावांवर खेळत आहे. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने आतापर्यंत तीन विकेट्स घेतले आहेत, तर लाहिरू कुमारा आणि केसरा नुवान्थाने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला १६५ धावांनी पराभूत केले . तो सामना गॉल येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला होता. आता, हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल
भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, सरांश जैन, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
श्रीलंका : लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पसिंदू सूर्यबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.
IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी






