Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commonwealth Games 2026 : भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुलमध्ये दाखवली विजयी कामगिरी; बॉक्सिंगमध्ये सात सुवर्ण

पुरुषांच्या एफ ५७ गोळाफेक स्पर्धेत भारताने पहिले-दुसरे स्थान मिळवले, ज्यात सोमन राणाने सुवर्णपदक आणि शुभम जुयालने रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेलने रौप्यपदक, तर सेल्वा प्रभू थिरुमारनने कांस्यपदक पटकावले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2026 | 08:01 AM
बॉक्सिंगमध्ये सात सुवर्ण

बॉक्सिंगमध्ये सात सुवर्ण

Follow Us
Follow Us:

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमधील भारताची प्रभावी कामगिरी ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांसह समाप्त झाली. प्रीती पवार, जास्मिन लंबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया घंघास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पांघल यांनी अव्वल स्थान पटकावले, तर जादुमणी सिंग, लव्हलिना बोरगोहेन आणि नरेंद्र बेरवाल यांनी आपापल्या वजन गटात रौप्य पदके जिंकली.

पुरुषांच्या एफ ५७ गोळाफेक स्पर्धेत भारताने पहिले-दुसरे स्थान मिळवले, ज्यात सोमन राणाने सुवर्णपदक आणि शुभम जुयालने रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेलने रौप्यपदक, तर सेल्वा प्रभू थिरुमारनने कांस्यपदक पटकावले. जुडोपटू उन्नती शर्मानेही कांस्यपदक जिंकले. भारताने आतापर्यंत एकूण ३९ पदके (१३ सुवर्ण, १७रौप्य आणि ९ कांस्य) जिंकली आहेत.

काश्मीरमधील सुरुंग स्फोटात एक पाय गमावलेल्या हवालदार सोमन राणाने १३.४० मीटर कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले. शुभम जुयालने १३.२८ मीटर फेक करून रौप्य जिंकले. २००६ मध्ये नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावताना राणा जखमी झाले होते. पुनर्वसनानंतर त्यांनी पॅरा-क्रीडेत प्रवेश केला. दोन पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या राणाने २०२५ पॅरा अॅथलेटिक्समध्येही रौप्यपदक जिंकले.

लंबोरियाने जिंकले होते २०२२ राष्ट्रकुलचे कांस्यपदक

हरियाणाची बॉक्सर जास्मिन लंबोरिया सध्या ५७ किलो वजनी गटात जगातील नंबर १ बॉक्सर आहे. तिने २०२५ च्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले. जास्मिन २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि तिने २०२२ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले.

अंतिम सामन्यात जादुमणीचा चांगला खेळ

सध्या ग्लास्गो स्कॉटलंड येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 ही स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी कमाल केली आहे. भारतीय मुष्टीयुद्ध प्रकारात जादुमणी सिंगने मंदेंगबाम याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. पुरुष बॉक्सिंग प्रकारात जादुमणीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या बॉक्सिंगपटूंनी आपली शानदार कामगिरी कायम राखली आहे.

CWC 2026 : फास्ट बॉलर बनायचं स्वप्न, पण नशिबाने खेळ बदलला; डेकॅथलॉनमध्ये भारताला कांस्यपदक जिंकवणारा Tejaswin Shankar कोण?

Web Title: India wins seven gold medals in boxing at the commonwealth games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
2

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
4

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.