Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

Boxing: स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व पदक विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आगामी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 09:46 PM
Thai Boxing competition

Thai Boxing competition

Follow Us
Follow Us:
  • विभागस्तरीय थाई बॉक्सिंगमध्ये पिंपरी-चिंचवड चॅम्पियन
  • अहिल्यानगर उपविजेता, तर सोलापूर तिसऱ्या स्थानी
  • आकुर्डीमध्ये ३७० खेळाडूंच्या चुरशीच्या लढती
पिंपरी/Boxing: आकुर्डी येथे रंगलेल्या पुणे विभागस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराच्या संघाने वर्चस्व राखत सर्वोत्कृष्ट कामगिरीसह विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेत अहिल्यानगरच्या संघाने (Pimpri) उपविजेतेपद, तर सोलापूरच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. पुणे विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या तब्बल ३७० खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने, बीना इंग्लिश मीडियम स्कूल व बीना स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी-चिंचवड थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने रविवारी (दि. २०) आकुर्डी येथील बीना स्पोर्ट्स क्लबच्या सभागृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. पुणे विभागातील सात जिल्ह्यांतील मुला-मुलींनी विविध वयोगट आणि वजनगटांत सहभाग घेतला होता. रिंगमधील अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतींमध्ये खेळाडूंनी कमालीचे तांत्रिक कौशल्य, चपळाई, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाभावनेचे दर्शन घडविले.

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव

मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव

स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व पदक विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आगामी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. थाई बॉक्सिंगसारख्या क्रीडाप्रकारातून युवकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास, शिस्त, धैर्य आणि क्रीडावृत्तीची जोपासना होते, अशा स्पर्धा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरतात, असा सूर पारितोषिक वितरणावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम

मान्यवरांची उपस्थिती व संयोजन

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बीना स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अजहर खान, शहाजी आतार, पिंपरी-चिंचवड अल्पसंख्याक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष युसुफ कुरेशी, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाचे पी. वाय. आतार, बीना स्पोर्ट्स क्लबचे अखमल खान, पी. के. स्कूलचे स्पोर्ट्स प्रमुख राहुल कोरे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेचे तांत्रिक कामकाज पुणे विभाग थाई बॉक्सिंगच्या अध्यक्षा प्रियंका मट्टी यांच्या देखरेखीखाली पार पडले. राष्ट्रीय पंच नाझीम शेख, अरबाज शेख, किरण माने, गायकवाड कारभारी आणि स्वप्निल वारुळे यांनी मुख्य पंच म्हणून अचूक जबाबदारी सांभाळली. स्पर्धेच्या यशस्वी नियोजनात गणेश मांढरे व अभिषेक शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर रविराज गाढवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Thai boxing competition pimpri chinchwad first rank and ahilyanagar second rank sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Boxing
  • Pimpri News
  • Sports News

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव
1

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
2

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
3

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
4

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.