Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते थेट टीम इंडियाची ‘स्टार’; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

श्रेयांका पाटीलचा जन्म कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे झाला. 31 जुलै 2002 रोजी तिचा जन्म झाला. तिचा क्रिकेटमध्ये करियर करण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी असा आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 02:05 PM
The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते टीम इंडियाची 'स्टार'; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते टीम इंडियाची 'स्टार'; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

Follow Us
Follow Us:

दुखापतीमुळे श्रेयांका पाटील संघाबहेर 
कर्नाटकच्या बंगळुरू येथे श्रेयांका पाटीलचा जन्म 
आरसीबीकडून घेतल्या सर्वाधिक विकेट्स

Shreyanka Patil/तेजस भागवत: सध्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर आज आपण ‘द मेकिंग ऑफ अ क्रिकेटर‘ या सिरिजमध्ये श्रेयांका पाटीलबद्दल जाणून घेणार आहोत. आलेल्या संकटांवर मात करून तिथून  फिनिक्स पक्षासारखी झेप घेणं यालाच संघर्ष म्हटले जाते. वयाच्या 23 व्या वर्षी क्रिकेट विश्वात आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या श्रेयांका पाटीलने केलेला संघर्ष आणि मेहनतीची कहाणी जाणून घेऊयात.

श्रेयांका पाटीलचा जन्म कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे झाला. 31 जुलै 2002 रोजी तिचा जन्म झाला. तिचा क्रिकेटमध्ये करियर करण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी असा आहे. तिला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराट कोहलीच ती प्रचंड मोठी चाहती होती. वयाच्या 7 ते 8 व्या वर्षापासूनच तिने आपले स्वप्न पूर्ण करण्याचे पहिले पाऊल टाकले. 8 व्या वर्षी तिने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आरसीबीची चाहती ते भारतीय क्रिकेट संघात आणि आरसीबीच्या संघात खेळण्याचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.

श्रेयांका पाटीलचे वडील आणि त्यांचा भाऊ हे देखील क्रिकेट खेळायचे. तिचे वडील देखील क्रिकेट अकादमी चालवतात. त्यामुळे क्रिकेटची आवड तिला लहानपणापासूनच निर्माण झाली होती. सुरुवातीला ती मध्यमगती गोलंदाजी करत असे. मात्र तिने तिच्यातील कौशल्य ओळखून ऑफ ब्रेक स्पिन गोलंदाजी सुरू केली आणि आज ती भारतीय महिला क्रिकेटमधील एक यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखली जात आहे.

The Making Of A Cricketer: वडिलांचा त्याग अन् Yastika ची अपार मेहनत; अशी बनली वडोदराची लेक टीम इंडियाची ‘स्टार’

प्रशिक्षक अर्जुन देव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयंका पाटीलच्या करियरला मोठी उभारी मिळाली. त्यांनी श्रेयंका पाटीलमधली क्रिकेट खेळण्याप्रतीचे प्रेम आणि अफाट क्षमता ओळखली. तिथूनच श्रेयंका पाटीलचा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळण्याचा प्रवास सुरू झाला. वयाच्या 17 व्या वर्षी श्रेयंकाने कर्नाटकच्या वरिष्ठ महिला संघात आपले स्थान पक्के केले.

कसा राहिला तिचा क्रिकेटचा प्रवास?

श्रेयंका विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची मोठी चाहती आहे. 2023 मध्ये आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलची सुरुवात करण्यात आली. 2023 मध्ये आरसीबीने श्रेयंकाला आपल्या संघात सामील करून घेतले. 2024 चा हंगाम श्रेयंकाने गाजवला. या हंगामात तिने आरसीबीकडून सर्वाधिक 13 विकेट्स घेत ‘पर्पल कॅप’ आपल्या नावावर केली. अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करत तिने आरसीबीला विजेतेपद मिळवून दिले होते.

The Making Of A Cricketer: भावाचे शूज अन् उसनी जर्सी; Kranti Goud चा टीम इंडियापर्यंत प्रवास, वाचा संघर्ष कहाणी

2023 हे वर्ष तिच्यासाठी आनंदाचे ठरले. तिने थेट भारतीय संघात प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने आपला पहिलं इंटरनॅशनल सामना खेळला. परदेशांमध्ये होणाऱ्या स्पर्धा खेळणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या टी 20 वर्ल्ड कप संघात तिची निवड झाली आहे. तिने पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र दुर्दैवाने दुसऱ्या म्हणजेच नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे ती पुढील सामने खेळू शकणार की नाही याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. भारतीय संघाकडून वर्ल्ड कप खेळण्याचे तिचे स्वप्न दुखापतीमुळे दूर राहणे हे तिच्यासाठी खूप वेदनादायी आहे. मात्र लवकरच या दुखापतीमधून सावरून भारतीय संघाकडून खेळताना दिसेल असा विश्वास क्रिकेटविश्वातून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Indian cricketer shreyanka patil rcb fan to enter team india the making of a cricketer struggle life icc ti 20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • Indian Women Cricket Team
  • The Making of A Cricketer

संबंधित बातम्या

Women’s T20 World Cup: टीम इंडियावर ओढवणार नामुष्की? एक पराभवामुळे बदलले समीकरण, जाणून घ्या
1

Women’s T20 World Cup: टीम इंडियावर ओढवणार नामुष्की? एक पराभवामुळे बदलले समीकरण, जाणून घ्या

IND W vs SA W Live: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियामध्ये 2 मोठे बदल, सेमीफायनलसाठी चुरशीची लढत सुरू
2

IND W vs SA W Live: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियामध्ये 2 मोठे बदल, सेमीफायनलसाठी चुरशीची लढत सुरू

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय
3

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार
4

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.