Indian Men's Team Defeats Brazil in a Hard-Fought match at Kho Kho World Cup 2025
नवी दिल्ली : खो खो जागतिक विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने ब्राझील संघावर 64-34 असा विजय मिळवला. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी धमाकेदार खेळाचे प्रदर्शन करीत ब्राझील संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले. ब्राझील संघाने सुरेख सुरुवात करत भारत विरुद्ध 16 गुणांची कमाई केली. पण भारत संघाने जोरदार कमबॅक केले. अखेर ब्राझील संघाने आपली ड्रीम रन पूर्ण करत दोन गुण प्राप्त केले.
भारतीय संघाची जोरदार लढत
दुसऱ्या सत्रात भारताच्या रॉकसन सिंग, पाबनी साबर, आदित्य गणपुले यांनी सुरेख खेळ करत संघाला 36 गुणांची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सत्रात मात्र, ब्राझील संघाने जोरदार खेळ केला. मौरो पिंटो, जोएल रोड्रिक्स व खास करून मॅथ्यूस कोस्टा यांनी संघाचे आव्हान कायम ठेवले. सामना संपण्यास सात मिनिटे शिल्लक असताना सामना 38-34 अशा स्थितीत होता.
अखेरच्या क्षणी भारताच्या आदित्य गणपुले आणि कर्णधार प्रतीक वाईकर यांनी संघाला आघाडीवर नेले. तर रॉकसन सिंगने स्कायडाईव्ह द्वारे चार गुण, मेहुलने टचलाईन द्वारे दोन गुणांची कमाई करताना संघाचा विजय सुकर केला.
इतर पारितोषिके
सर्वोत्तम आक्रमक खेळाडू: पाबरी साबर
सर्वोत्तम बचाव पटू: मॅथ्यूस कोस्टा
सामनावीर : प्रतीक वाईकर
पुरुषांचे २० संघ सहभागी
खो-खो विश्वचषक २०२५ च्या सलामीच्या सामन्यात या स्पर्धेमध्ये पुरुषांचे २० संघ सहभागी झाले आहेत. तर महिलांचे १९ संघ सहभागी झाले आहेत. भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये भारताने सोमवारी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर नेपाळचा ४२-३७ असा पराभव करून खो खो विश्वचषक २०२५ मध्ये शानदार सुरुवात केली. भारताच्या अष्टपैलू कामगिरीने, कर्णधार आणि संघ वझीर प्रतीक वायकर यांच्या नेतृत्वाखाली खो खोचा एक नेत्रदीपक दिवस रंगतदार उद्घाटन समारंभाने पार पाडला, ज्यामुळे संघाला चमकदार ट्रॉफीसाठी स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले.
नेपाळवर मोठा विजय
भारताने शानदार सुरुवात केली आणि सामन्याच्या पहिल्याच वळणात अवघ्या ६० सेकंदात नेपाळच्या पहिल्या तीन बचावपटूंचा नाश केला. प्रतिक वायकर आणि रामजी कश्यप यांच्या नेत्रदीपक उडत्या उड्डाणांमुळे भारताने टर्न १ मध्ये तीन मिनिटे शिल्लक असताना १४-गुणांची आघाडी घेतली, ज्यात त्यांनी नेपाळच्या दोन बचावपटूंना बाहेर काढले. प्रतिक वायकरच्या जागी ‘वझीर’ म्हणून आलेल्या सचिन भार्गोने रात्रीची उत्तम चाल दाखवली. त्याने नेत्रदीपक स्कायडाईव्ह करत ब्रेकमध्ये स्कोअर २४ टच पॉइंटवर नेला, ज्यामुळे नेपाळ संघ ‘ड्रीम रन’ गाठू शकला नाही.