बांग्लादेशच्या (Bangladesh) धर्तीवर सध्या टी २० महिला आशिया चषक स्पर्धा(T20 Women Asia Cup) खेळवली जात आहे. यास्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच असून आता भारताने थायलंड विरुद्धचा सामना जिंकून आपले फायनलचे तिकीट पक्के केले आहे.
सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात भारताने थायलंडचा (Malaysia) ७४ धावांनी पराभव केला. या सामन्यात थायलंड संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी थायलँडसमोर १४९ धावांचं लक्ष्य ठेवलं.
???? ??? ????? ? ?
A superb bowling performance from #TeamIndia to beat Thailand by 7️⃣4️⃣ runs in the #AsiaCup2022 Semi-Final ?? #INDvTHAI
Scorecard ▶️ https://t.co/pmSDoClWJi
? Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/NMTJanG1sc
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2022
भारताने दिलेलं आव्हान पूर्ण करताना मलेशियाच्या महिला संघाने गुढघे टेकले. दरम्यान, तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) या सामन्यातही जबरदस्त फलंदाजीनंतर गोलंदाजीतही मोठं योगदान दिले. भारतीय महिला संघाने टी २० महिला आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्याने सर्व स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.