Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांग्लादेशवर दमदार विजय, टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

भारताच्या संघाने पहिली फलंदाजी करून बांग्लादेश समोर 146 धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु बांग्लादेशच्या संघाने 20 षटकांत आठ बाद 101 धावांपर्यंत मजल मारता आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 29, 2024 | 12:35 PM
भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांग्लादेशवर दमदार विजय, टी-20 मालिकेत 1-0 आघाडी
Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध बांग्लादेश : 28 एप्रिलपासून भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेश महिला संघावर 44 धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाने पहिली फलंदाजी करून बांग्लादेश समोर 146 धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु बांग्लादेशच्या संघाने 20 षटकांत आठ बाद 101 धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या रेणूका सिंग, पूजा वस्त्रकार यांच्यासह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताला विजय मिळाला. 18 धावांत तीन फलंदाज बाद करणारी रेणूका सिंग ही सामन्याची मानकरी ठरली. शेफाली वर्माने 31 धावांची, यास्तिका भाटीयाने 36 धावांची, कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 धावांची आणि रिचा घोषने 23 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 20 षटकांत सात बाद 145 धावा फटकावल्या. रेणूका सिंग हिने 18 धावांमध्ये दिलारा अख्तेर, शोभना मोस्तरी व राबेया खान यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पूजा वस्त्रकार हिने 25 धावा देत दोन फलंदाज बाद केले. तसेच श्रेयांका पाटील, दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामधील दुसरा सामना 30 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन सामने 2 मे, 6 मे व 9 मे रोजी होणार आहेत.

Web Title: Indian womens cricket teams emphatic win over bangladesh 1 0 lead in t20 series team india renuka singh pooja vastrakar harmanpreet kaur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2024 | 12:35 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • india vs Bangladesh
  • T20 series

संबंधित बातम्या

IND W vs SL W : महिला विश्वचषकच्या सलामी सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य! अमनजोत कौर चमकली 
1

IND W vs SL W : महिला विश्वचषकच्या सलामी सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य! अमनजोत कौर चमकली 

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…
2

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…

IND vs SL सामन्याआधी भारतीय महिला संघाची घेतली श्रेया घोषालने भेट! खेळाडूंना केलं गाण्याने मंत्रमुग्ध, पहा Video
3

IND vs SL सामन्याआधी भारतीय महिला संघाची घेतली श्रेया घोषालने भेट! खेळाडूंना केलं गाण्याने मंत्रमुग्ध, पहा Video

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर
4

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.