Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ICC T20 rankings : आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताची दीप्ती चमकली! पहिल्यांदाच  झाली अव्वलस्थानी विराजमान 

भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा ७३७ रेटिंग गुण मिळवून आयसीसी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. शर्मा तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान मिळवले मिळवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 24, 2025 | 02:53 PM
India's Deepti Sharma has reached the top spot in the ICC T20 rankings for the first time.

India's Deepti Sharma has reached the top spot in the ICC T20 rankings for the first time.

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताची दीप्ती शर्मा आयसीसी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल 
  • दीप्ती शर्माने कारकिर्दीत पहिल्यांदाच पहिले स्थान पटकावले
  • दीप्ती शर्मा ७३७ रेटिंग गुण मिळवून आघाडीवर पोहचली आहे
Deepti Sharma tops the ICC T20 rankings : भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली. तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तिने पहिले स्थान पटकावले आहे. विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात, २८ वर्षीय ऑफ स्पिनरने २० धावांत एक विकेट घेत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अॅनाबेल सदरलँडला मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचली.

हेही वाचा :Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीचा झंजावता सुरूच! विजय हजारे ट्रॉफीमध्ये ठोकले जलद शतक; अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू 

दीप्ती शर्मा ७३७ रेटिंग गुण मिळवून आघाडीवर पोहचली आहे, जे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजापेक्षा एक रेटिंग गुण पुढे आहे. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी पाच स्थानांनी वाढून ३६ व्या स्थानावर पोहोचली आहे, तर फिरकी गोलंदाज श्री चरणी १९ स्थानांनी वाढून ६९ व्या स्थानावर पोहोचली आहे. विशाखापट्टणममध्ये ४४ चेंडूत नाबाद ६९ धावा करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज पाच स्थानांनी वाढून नवव्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय उपकर्णधार स्मृती मानधना अव्वल क्रमांकाची भारतीय फलंदाज आहे. ती तिसऱ्या स्थानावर आहे. शफाली वर्मा एका स्थानाने घसरून १० व्या स्थानावर आली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत स्मृतीच्या जागी अव्वल क्रमांकाची फलंदाज झाली आहे.

आयर्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सलग शतके झळकावणारी वोल्वार्डने १२४ आणि १०० नाबाद धावा काढत स्मृतीवर नऊ गुणांची आघाडी घेतली आहे. वोल्वाड ने कारकिर्दीतील सर्वोत्तम ८२० रेटिंग गुण मिळवले आहेत. आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस ४५ आणि ६४ धावा केल्यानंतर चार स्थानांनी पुढे १८ व्या स्थानावर आली आहे. तिची सहकारी एमी हंटर ३१ व्या स्थानावरून २८ व्या स्थानावर आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची सून लुस (सात स्थानांनी पुढे ३४ व्या स्थानावर) आणि डेन व्हॅन निकेर्क (२४ स्थानांनी पुढे ९५ व्या स्थानावर) यांनीही त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.

हेही वाचा : IND W vs SL W 2nd T20: भारतीय महिलांचा लंकेवर पुन्हा विजय! दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा; मालिकेत २-० ने आघाडी

Web Title: Indias deepti sharma has reached the top spot in the icc t20 rankings for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • ICC Rankings
  • T20 cricket

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : दीड वर्षात भारतीय संघात झाला मोठा बदल! मैदानात दिसणार नाहीत ‘हे’ विश्वचषक विजेते खेळाडू 
1

T20 World Cup 2026 : दीड वर्षात भारतीय संघात झाला मोठा बदल! मैदानात दिसणार नाहीत ‘हे’ विश्वचषक विजेते खेळाडू 

T20 World Cup 2026 : ‘दक्षिण आफ्रिका-भारत फायनलमध्ये आमनेसामने…’ आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांचा आशावाद
2

T20 World Cup 2026 : ‘दक्षिण आफ्रिका-भारत फायनलमध्ये आमनेसामने…’ आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांचा आशावाद

IND vs SA 5th T20 : हार्दिकने मारलेलाल चेंडू कॅमेरामनवर आदळला! गौतम गंभीरच्या हृदयाचा ठोका चुका अन्…; VIDEO VIRAL
3

IND vs SA 5th T20 : हार्दिकने मारलेलाल चेंडू कॅमेरामनवर आदळला! गौतम गंभीरच्या हृदयाचा ठोका चुका अन्…; VIDEO VIRAL

IND vs SA 5th T20I : संजू सॅमसनच्या शॉटने घेतला पंचाचा वेध! रोहन पंडित मैदानातच कोसळले; वेदनेने विव्हळतानाचा VIDEO व्हायरल
4

IND vs SA 5th T20I : संजू सॅमसनच्या शॉटने घेतला पंचाचा वेध! रोहन पंडित मैदानातच कोसळले; वेदनेने विव्हळतानाचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.