विराट कोहली : T-20 विश्वचषक (T-20 World Cup) २ जूनपासून सुरु होणार आहे. T-20 विश्वचषकाची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 जून पासून सर्वांच्या नजरा T-20 विश्वचषकावर असणार आहेत. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या या सीझनमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार कामगिरी करत सिझनची ऑरेंज कॅप नावावर केली. या सीझनमध्ये त्याने आयपीएलमध्ये 15 सामन्यांमध्ये 741 धावा केल्या. विराटच्या स्फोटक फलंदाजीने त्याने संघाला क्वालिफायर सामन्यांपर्यत नेले. आता 2024 च्या टी-20 विश्वचषकातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे.
[read_also content=”T20 World Cup 2024 ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज; संघाचा जोरदार सराव; पाहा फोटो आणि व्हिडीओ https://www.navarashtra.com/sports/team-india-ready-to-rock-t20-world-cup-2024-practice-started-in-new-york-please-see-photos-and-videos-nryb-540124.html”]
विराट कोहलीच्या कामगिरी बद्दल विचार केला तर, 2022 पासून विराट कोहलीचा आरतीम अप्रतिम फॉर्म दाखवला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याचप्रमाणे, तो T-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकणारा खेळाडू आहे. T-20 विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार कोहलीने आतापर्यत एकूण सात वेळा जिंकला आहे. या यादीमध्ये सर्वात जास्त पुरस्कार पटकावणारा विराट कोहली हा अव्वल स्थानावर आहे. तर आर अश्विन आणि युवराज सिंह या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 3 पुरस्कार पटकावले आहेत.
T-20 विश्वचषकात भारतासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकणारे टॉप-3
विराट कोहली- 7
रविचंद्रन अश्विन-3
युवराज सिंग-3
भारताचा संघ T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी अमेरिकेला रवाना
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना झाला. पहिल्या तुकडीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत त्याचबरोबर काही सपोर्टींग स्टाफचा समावेश होता. तर दुसऱ्या तुकडीमध्ये इतर खेळाडू इंडियन प्रीमियर लीग 2024 चा सिझन संपल्यानंतर रवाना झाले. टीम इंडिया T-20 विश्वचषक 2024 च्या माध्यमातून दीर्घकाळ चाललेला ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवू इच्छित आहे. भारतीय संघाने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने जिंकली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली ही ट्रॉफी मिळाली. याशिवाय टीम इंडियाने 2007 मध्ये T-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते, जी या स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. धोनीच्या नेतृत्वाखाली T-20 विश्वचषक ट्रॉफीही जिंकली होती.