
ITF Tennis Tournament
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या स्पर्धेत अनेक अव्वल टेनिसपटू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासह महत्त्वाचे एटीपी गुण आणि पारितोषिकाची रक्कम मिळवण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहे. भारतीय टेनिसपटूंना आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रगती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये करण सिंग, दिग्विजय प्रताप सिंग, सिद्धार्थ रावत, एस. डी. प्रज्वल देव, मनीष सुरेशकुमार आणि देव जाविआ हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. एमएसएलटीएचे सहसचिव आणि स्पर्धा संचालक राजीव देसाई यांनी सांगितले की, अर्णव पापरकर आणि अनुप बंगार्गी यांना मुख्य ड्रॉसाठी, तर प्रज्वल तिवारी, वंश नांदल आणि मायंद तिवारी यांना पात्रता फेरीसाठी वाइल्ड कार्ड देण्यात आले आहे. भारतासह अमेरिका, ट्युनिशिया, जपान, थायलंड, स्वित्झर्लंड, कझाकस्तान, नेपाळ आणि स्वीडन या नऊ देशांतील खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक आणि ५० एटीपी गुण, तर उपविजेत्याला करंडक आणि ३० एटीपी गुण मिळतील. उपांत्य फेरीतील खेळाडूंना १८, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना ९, त्यापूर्वीच्या फेरीतील खेळाडूंना ५, तर पहिल्या फेरीतील खेळाडूंना १ एटीपी गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामने ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी, तर मुख्य ड्रॉमधील सामने १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेसाठी इराणच्या नेदा काझेमी यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या लीना नागेशकर सहाय्यक सामना पर्यवेक्षक म्हणून, तर राजीव देसाई स्पर्धा संचालक म्हणून काम पाहतील. रोहित बालगवी (कर्नाटक), शैलेश तांबे (मुंबई), सेल्वराज कोट्टेश्वरन (चेन्नई), रितुराज बसंत (आसाम), सैबल बॅनर्जी (कोलकाता) आणि करण सिंग (दिल्ली) यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री
१. गॅरेट जॉन्स (अमेरिका, ४४२), २. करण सिंग (भारत, ४८३), ३. अझीझ ओउका (ट्युनिशिया, ५३१), ४. दिग्विजय प्रताप सिंग (भारत, ५५१), ५. सिद्धार्थ रावत (भारत, ६५४), ६. एस. डी. प्रज्वल देव (भारत, ६५९), ७. रियुकी मात्सुदा (जपान, ६७९), ८. मनीष सुरेशकुमार (भारत, ७०१).