
‘Hindavi Warriors Trophy’
पहिल्यांदा खेळणाऱ्या डिलीजंट इलेव्हनने २९ षटकामध्ये १२२ धावांचे लक्ष्य उभे केले. अनुष्का वाईकर हिने ४५ धावा आणि राजलक्ष्मी कोरे हिने २८ धावा करून संघाचा डाव उभा केला. वॉरीयर्सच्या आर्या जी. हिने तीन गडी बाद केले. स्वामीनी जेरूरकर, श्रिया चव्हाण आणि लावण्या मेमाने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबने २३.३ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. श्रावणी जामदार (४१ धावा) आणि आयाध्या जाधव (२८ धावा) यांनी धावा जमवून संघाचा विजय सोपा केला.
१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्…! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय
आदिती झेंडे आणि अश्लेषा झेंडे या भगिनींनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एसपी राठोड इलेव्हनने रिक्रीएशन ॲकॅडमीचा ४६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसपी राठोड इलेव्हनने २०७ धावा धावफलकावर लावल्या. सौम्या कड (५२ धावा), आर्या देशमुख (४२ धावा), अमृत आर्या (२४ धावा) आणि जान्हवी भांडे (नाबाद २९ धावा) यांनी संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. याला उत्तर देताना रिक्रीएशन ॲकॅडमीचा डाव १६१ धावांवर संपुष्टात आला.
अनुसूया कबाडे (३२ धावा), गौरी मांडे (३० धावा) आणि इश्वरी खेत्री (२३ धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. एसपी संघाच्या आदिती झेंडे हिने २४ धावांमध्ये तीन गडी बाद केले. अश्लेषा झेंडे हिने तीन गडी तर, वैष्णवी महाडीक हिने दोन गडी बाद करून संघाचा विजय निश्चित केला.
सामन्यांचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी :
एसपी राठोड इलेव्हन : ४३ षटकात ५ गडी बाद २०७ धावा (सौम्या कड ५२ (८९, ८ चौकार), आर्या देशमुख ४२, अमृत आर्या २४, जान्हवी भांडे नाबाद २९, स्वरा देशपांडे २-४२) वि. वि. रिक्रीएशन ॲकॅडमी : ३७.४ षटकात १० गडी बाद १६१ धावा (अनुसूया कबाडे ३२, गौरी मांडे ३०, इश्वरी खेत्री २३, आदिती झेंडे ३-२४, अश्लेषा झेंडे ३-३४, वैष्णवी महाडीक २-१७); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू : आदिती झेंडे;
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
डिलीजंट इलेव्हन : २९ षटकात १० गडी बाद १२२ धावा (अनुष्का वाईकर ४५, सर्वज्ञा वाकोडे १६, राजलक्ष्मी कोरे २८, आर्या जी. ३-४६, स्वामीनी जेरूरकर २-२३, श्रिया चव्हाण २-७, लावण्या मेमाने २-१४) पराभूत वि. वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब : २३.३ षटकात ५ गडी बाद १२३ धावा (श्रावणी जामदार ४१, आयाध्या जाधव २८, आदिती वाघमारे नाबाद १६, काव्या मोहोळ २-१७, मुक्ता परमशेट्टी २-३०); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू : स्वामीनी जेजूरकर.