रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलचा एलिमिनेटर सामना गमावल्यानंतर जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यामुळे पुन्हा एकदा बंगळूरूच्या चाहत्यांच्या पदरी निराशा आलीये. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवासाठी आरसीबीच्या कोणत्याही एका खेळाडूला जबाबदार धरणे चुकीचे ठरू शकते कारण सर्वांनीच निराशाजनक कामगिरी केली. पण कोणत्या खेळाडूने सर्वाधिक निराश केले याचा जर आपण विचार केला तर पहिले नाव येईल ते ग्लेन मॅक्सवेलचे. फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, जेव्हा जेव्हा मॅक्सवेलला संधी मिळाली तेव्हा त्याने ती गमावली असल्याचे यावेळी दिसून आले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 8 विकेट गमावत 172 धावा केल्या. आरसीबीसाठी रजत पाटीदारने 174, विराट कोहलीने 33 आणि महिपाल लोमरने 32 धावा केल्या. कॅमेरून ग्रीन 27, फाफ डू प्लेसिस 17, दिनेश कार्तिक 11 आणि कर्ण शर्मा 5 धावा करून बाद झाले. पण ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. (फोटो सौजन्य – Instagram)
[read_also content=”रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयलचा विजय, पुन्हा एकदा RCB चे स्वप्न भंगले https://www.navarashtra.com/sports/ipl-2024-rcb-vs-rr-eliminator-match-will-start-shortly-will-rcbs-victory-cart-stop-rajasthan-see-live-updates-nryb-536845.html”]
ग्लेन ठरला ४ वेळा गोल्डन डकचा बळी
ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला आला तेव्हा आरसीबीची धावसंख्या 12.3 षटकांत 3 बाद 97 धावा होती. मॅक्सवेल अपेक्षेप्रमाणे खेळला असता तर आरसीबीला 190 पेक्षा मोठी धावसंख्या उभारता आली असती. पण मॅक्सवेलला कदाचित खूप घाई होती. येताच त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली. RCB ची धावसंख्या अचानक 2 विकेटसाठी 97 धावांवरून 4 विकेट 97 धावांवर बदलली. या हंगामा ग्लेन मॅक्सवेल 0 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही चौथी वेळ होती.
[read_also content=”विराट कोहलीला दहशतवाद्यांकडून धमकी https://www.navarashtra.com/sports/terror-threat-against-virat-kohli-rcb-cancel-practice-press-conference-ahead-of-eliminator-heres-why-nryb-536788.html”]
सोपा कॅचही सोडला
फिल्डिंग करताना ग्लेन मॅक्सवेलला संघासाठी योगदान देण्याची संधी मिळाली होती पण त्याने पुन्हा निराशा केली. त्याने यश दयालच्या चेंडूवर टॉम कोहलर-कॅडमोरचा सोपा झेल सोडला. मॅक्सवेलने कॅडमोरचा झेल सोडला तेव्हा तो 11 धावांवर खेळत होता आणि राजस्थानची धावसंख्या 4 षटकात विकेट न गमावता 35 धावा होती. हा झेल पकडला असता तर कदाचित बंगळूरूचा विजय होऊ शकला असता अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे.
10 मॅचमध्ये केवळ 52 रन्स
ग्लेन मॅक्सवेलसाठी हा सामनाच नाही तर संपूर्ण IPL 2024 ची स्पर्धाच निराशाजनक ठरली असल्याचे दिसून आले आहे. त्याने आयपीएल 2024 मध्ये 10 सामने खेळले आणि त्याला 5.77 च्या सरासरीने केवळ 52 धावा करता आल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 28 होती. हा एक डाव सोडला तर मॅक्सवेलने 9 डावात केवळ 24 धावा केल्या आहेत. त्यामुळे हा महागडा खेळाडू यावर्षी रॉयल चॅलेंजर्सच्या टीमसाठी विलन ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.