Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचे अखेर ठरले! KL Rahul नाही, तर ‘या’ बड्या खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा!

दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार अद्याप घोषित केलेला नाही. पण केएल राहुलकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता होती, मात्र राहुलने कर्णधारपद नाकारले आहे. त्यामुळे अक्षर पटेलकडे संघाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 11, 2025 | 03:28 PM
IPL 2025: Delhi Capitals' fate is decided! Not KL Rahul, but 'this' big player has been handed over the reins of the team!

IPL 2025: Delhi Capitals' fate is decided! Not KL Rahul, but 'this' big player has been handed over the reins of the team!

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार संपला असून आता आयपीएलचा थरार रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तसेच आता देशात T20 IPL 2025 ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार घोषित केलेला नाही. पण केएल राहुलकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता होती, अशी चर्चा होती, मात्र राहुलने कर्णधारपद नाकारले आहे.

केएल राहुल हा याआधी  लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार होता, परंतु लिलावापूर्वी एलएसजीने त्याला कर्णधारपदी कायम ठेवले नाही आणि त्याला लिलावात विकतही घेतले नाही. त्यानंतर दिल्लीने राहुलवर बाजी लावली. अशा परिस्थितीत आता राहुल दिल्लीचा कर्णधार होईल असे वाटत असतान, मात्र आता राहुलने डीसीचे कर्णधारपद नाकारल्याची बातमी समोर आली आहे.  त्यानंतर आता अष्टपैलू अक्षर पटेलकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Champion Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक नाहीच; ‘हे’ कारण आलं समोर..

दिल्लीची धुरा कोणाकडे?

अक्षर पटेलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत तो आता आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचे कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याची चर्चा आहे.  या आयपीएलमध्ये त्याने काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, संपूर्ण हंगामात त्याने कधीही कर्णधारपद भूषवलेले नाही.

डीसी अक्षर पटेलला पसंती देणार?

आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, अक्षर पटेलला लवकरच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.  आयएएनएसच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितले की, केएल राहुलला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेलला कर्णधार पदी बढती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केएल राहुलचा  कर्णधारपदास नकार..

केएल राहुलच्या पाठीशी आयपीएलमध्ये दोन संघांचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. त्याने 2020 आणि 2021 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. परंतु, दोन्ही हंगामात पंजाबला गुणतालिकेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्याच वेळी, 2022-2024 पर्यंत, त्याने लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ची जबाबदारी स्वीकारली आणि संघाला दोनदा प्लेऑफमध्ये पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली.  पण आता त्याने दिल्लीचे कर्णधारपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : कसोटी क्रिकेटसाठी 2027 हे वर्ष असणार खास! ऑस्ट्रेलिया-इंग्लंडने केली मोठी घोषणा, वाचा सविस्तर

अक्षर यापूर्वी डीसीच्या  कर्णधारपदी..

अक्षर पटेल सध्या भारतीय T20 संघाचा उपकर्णधार आहे. आयपीएल 2024 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचे काही सामन्यात नेतृत्व करताना दिसला होता. स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंतला गेल्या मोसमात सामन्यातून बंदीला सामोरे जावे लागले होते.  त्यावेळी तो दिल्लीचा कर्णधार झाला. अक्षरने त्याच्या 150 सामन्यांच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 1,653 धावा केल्या आहेत आणि 123 विकेट्स मिळवल्या आहेत.

Web Title: Ipl 2025 axar patel to replace kl rahul as delhi capitals captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Axar Patel
  • Champions Trophy
  • Delhi Capitals
  • IPL 2025
  • KL Rahul Captain

संबंधित बातम्या

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
1

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.