चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक नाहीच; 'हे' कारण आलं समोर..(फोटो-सोशल मिडीया)
Champion Trophy : भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या अर्धशतकाचे मोठे योगदान आहे. तसेच भारतीय फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असून त्या जोरावर भारताने हा विजय मिळवला आहे. विजयी ट्रॉफी घेऊन भारतीय खेळाडूही मायदेशी परतले आहेत. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर ज्याप्रमाणे भारतीय संघाने विजयाची परेड केली त्याचप्रमाणे यावेळीही भारतीय खेळाडू खुल्या बसमध्ये परेड करतील का? अशी आशा लावून चाहते बसले आहेत. पण यावेळी अशी कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलेला भारतीय संघ पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांसोबत खुल्या बसमध्ये आपला विजयी जल्लोष साजरा करेल, अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, असे होणार नाही, कारण ऋषभ पंत सोमवारी सकाळीच दिल्लीत पोहोचला, तर रोहित शर्माही रात्री उशिरा मुंबईत दाखल झाला आहे. याशिवाय रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती चेन्नईत दाखल झाले आहेत. इतर काही खेळाडूही भारतात पोहोचले आहेत.
हेही वाचा : चॅम्पियन ट्रॉफीचा जल्लोष साजरा करणाऱ्या चाहत्यांवर तेलंगणामध्ये लाठीचार्ज! BJP ने शेअर केला Video
भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. अशा वेळी विजयी परेड का आयोजित करण्यात आली नाही? हा प्रश्न प्रत्येकाला पडू लागला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की,भारतीय खेळाडू बरेच दिवस व्यस्त होते आणि आता 22 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू आयपीएलमध्ये आपापल्या संघात सामील होणार आहेत. दरम्यान, वेळ खूपच कमी आहे, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचे खास असे स्वागत होताना दिसत नाहीये.
तसेच, असेही मानले जात आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल 2025 दरम्यान किंवा नंतर या खेळाडूंना सन्मानित करू शकते, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी स्वतःच एक मिनी वर्ल्ड कप असल्याचे सर्वांचे मत आहे. विशेष म्हणजे भारताने सलग अंतिम फेरीत धडक मारत 12 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली आहे.
हेही वाचा : चॅम्पियन ट्रॉफी संपली, भारत पुढील सामना कोणाविरुद्ध खेळणार? वाचा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.