Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्याच्याकडे विचार करण्यासाठी…’, Rishabh Pant च्या IPL मधील फॉर्मवर Cheteshwar Pujara चे खळबळजनक विधान..

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४२ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा अनुभवी कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारानेही पंतच्या फॉर्मबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 25, 2025 | 02:05 PM
'He has something to think about...', Cheteshwar Pujara's sensational statement on Rishabh Pant's form in the IPL..

'He has something to think about...', Cheteshwar Pujara's sensational statement on Rishabh Pant's form in the IPL..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : देशात आयपीएल २०२५ चा थरार सुरू आहे. प्रत्येक संघ प्लेऑफ फेरीत जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आतापर्यंत ४२ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतची चर्चा सुरू झाली आहे. एलएसजी आयपीएल २०२५ मध्ये त्याच्या सर्वात महागड्या कर्णधारासोबत खेळत आहे. कर्णधार ऋषभ पंतला २७ कोटींच्या किमतीत खरेदी करण्यात आले आहे.  परंतु हा तडाखेबाज फलंदाज १८ व्या हंगामात पूर्णपणे शांत दिसून येत आहे. त्याच्या बॅटमधून धावाच येणे बंद झाले आहे. त्याच्या खराब फॉर्मचा परिणाम त्याच्या संघावरही झालेला दिसून येत आहे.  कर्णधार ऋषभ पंतच्या खराब फॉर्मबद्दल अनेक जण टीका करत आहेत.

हेही वाचा : IPL 2025 : मिस्टर 360 की Nicholas Pooran, कोण फलंदाज उत्तम? टी-२० आणि IPL च्या आकडेवारीने दिले ‘हे’ उत्तर..

आयपीएल २०२५ मध्ये ऋषभ पंतची बॅट तळपताना दिसत नाहीये. त्यामुळे चाहते नाराज आहेत. दरम्यान, भारताचा अनुभवी कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने पंतच्या खराब फॉर्मवर भाष्य केले आहे. त्याने ऋषभ पंतच्या खराब फॉर्ममागील कारण देखील सांगितले आहे. पुजारा नेमकं काय बोलला ते आपण जाणून घेऊया.

पुजाराने पंतच्या खराब फॉर्ममागील कारण..

ऋषभ पंतच्या खराब फॉर्मबद्दल बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला आहे की, ‘जेव्हा पंत कसोटी सामने खेळतो तेव्हा त्याच्याकडे विचार करण्यासाठी आणि खेळण्यासाठी अतिरिक्त वेळ असतो. त्याला चांगले माहित आहे की गोलंदाज त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी क्षेत्ररक्षण आक्रमक असते, स्लिपमध्ये देखील खेळाडू असतात, ज्यामुळे त्याला खेळण्यासाठी अधिक गॅप मिळतो. परंतु टी-२० मध्ये गोष्टी खूप वेगवान असतात, ज्यामुळे पंतसाठी गोष्टी कठीण होऊ शकतात.’

हेही वाचा : ‘देशापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही..’, Arshad Nadeem ला भारताच्या आमंत्रणांवरून Neeraj Chopra ने केली वेदनेला वाट मोकळी..

ऋषभ पंतची आयपीएल २०२५ मधील कामगिरी

आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना, ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. ऋषभ पंतने ९ सामन्यांपैकी ८ वेळा फलंदाजीसाठी मैदानात आल आहे. या आठ डावांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त १०६ धावाच निघू शकल्या आहेत. त्याच वेळी, सरासरी १३.२५ आणि स्ट्राइक रेट केवळ ९६.३६ आहे. या काळात, त्याची सर्वोच्च धावसंख्या ६३ धावा राहिली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ही खेळी केली होती.

आरसीबीचा घरच्या मैदानावर दणदणीत विजय :

काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला आणि त्यांना सीझनमधील सातवा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.

Web Title: Ipl 2025 cheteshwar pujaras commentary on rishabh pants form in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • bcci
  • Cheteshwar Pujara
  • IPL 2025
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
2

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
3

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
4

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.