IPL 2025 These Legends who Played Under The Captaincy of MS Dhoni Became Coaches Mahi will Spread his Magic with The Bat
IPL 2025 : महेंद्रसिंग धोनीने त्याच्या बॅटचे वजन कमी केले आहे. आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत, माही जड बॅट वापरण्यासाठी ओळखला जात होता. परंतु आयीपएल साठी माहीने बॅटवर मोठे काम केले आहे. आता धोनी हलक्या बॅटने आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी, टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामना पाहणाऱ्या एका माणसाचा व्हिडीओ सर्वत्र पाहिला गेला होता आणि तो चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालून सामना पाहत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तो दुसरा तिसरा कोणी नसून महेंद्रसिंग धोनी होता. या व्हिडीओनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता की, धोनीने IPL 2025 ची तयारी सुरू केली आहे का?
या हंगामाचे वेळापत्रक होणार जाहीर
नुकतेच IPL २०२५ हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. हा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याची तयारी सुरू केली आहे. खरंतर, सूत्रांवर विश्वास ठेवला तर, या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी माही त्याच्या बॅटमध्ये मोठा बदल करू शकतो. महेंद्रसिंग धोनी त्याच्या बॅटचे वजन कमी करणार आहे. आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत, माही जड बॅट वापरण्यासाठी ओळखला जातो.
धोनी मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो
माहीची ओळख म्हणजे त्याचे मोठे फटके खेळण्याचे वजनदार बॅट. साधारणपणे महेंद्रसिंग धोनी त्याच्या अंडर-१९ दिवसांत सुमारे १२०० ग्रॅम वजनाची बॅट वापरत होता आणि त्याचे बहुतेक बॅट जालंधरमध्ये बनवली जाते. या बॅटनंतर माहीने सुमारे १३०० ग्रॅम वजनाची बॅट वापरण्यास सुरुवात केली. माहीच्या घरी नुकतेच ५ बॅट पोहोचवण्यात आल्या आहेत. हे बॅट जालंधरमध्ये बनवले गेले आहेत.
धोनीचा माजी सहकारी सुरेश रैनाने सांगितले रहस्य
यापूर्वी, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, महेंद्रसिंग धोनीचा माजी सहकारी सुरेश रैनाने सांगितले होते की माही त्याच्या बॅटवर काम करीत आहे. वाढत्या वयामुळे आणि कमी होणाऱ्या रिफ्लेक्सेसमुळे धोनीने हे पाऊल उचलले आहे आणि तो फलंदाजीच्या क्रमातही बदल करू शकतो असे संकेत आहेत.
चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमध्ये होणार सामील
महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज कॅम्पमध्ये सामील होण्याच्या तारखेबाबत अजूनही अनिश्चितता आहे. माही चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमध्ये कधी सामील होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, यापूर्वी अशी बातमी होती की माजी कर्णधार चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शिबिराचा भाग होईल, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये माहीची गणना होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी ५ वेळा विजेतेपद जिंकले आहे. माही मार्चमध्ये संघात सामील झाला असला तरी, त्याने आधीच सराव सुरू केला आहे आणि रांची आणि मुंबई दोन्ही ठिकाणी तो मैदानाबाहेर चेंडू मारताना दिसला आहे.
हेही वाचा : AUS vs SA सामन्यात पावसाची हजेरी, जाणून घ्या रावळपिंडीतील हवामानाची ताजी स्थिती