IPL 2025: 'He's a wonderful man, that's why..', Why did Punjab Kings shower Shreyas Iyer with Rs 26.75 crore? Ricky Ponting reveals.
IPL 2025 : आयपीएल २०२५ शेवटच्या टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ६९ सामने खेळवून झाले आहेत. आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यातआधी पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 20 ओवर मध्ये १८४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात पंजाब संघाने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून सहज विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या विजयानंतर पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग त्याच्यावर खूप आनंदी दिसून आले आहेत.
पॉन्टिगने अय्यरचे खूप कौतुक केले आहे. पॉन्टिंग म्हणाला की, ‘श्रेयस अय्यरने संपूर्ण आयपीएलमध्ये शानदार खेळ केला आहे. त्याची कर्णधारपदाची कारकीर्द देखील जबरदस्त राहिली आहे. तो एक उत्तम खेळाडू आणि एक अद्भुत माणूस देखील आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्यावर इतके मोठे पैसे खर्च केले आहेत.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्ज संघाने २६.७५ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून अय्यरला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. या स्टार खेळाडूने चालू हंगामात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने आपल्यावर मोजलेल्या रक्कमेचे चीज करून दाखवले आहे. त्याच्या उत्कृष्ट कर्णधारपदाच्या जोरावर त्याने पंजाब संघाला प्लेऑफमध्ये पोहचवले आहे. ते देखील टॉपचा नंबर राखला आहे.
अय्यर केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाजीमध्ये देखील प्रभावी राहिला आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ५१.४० च्या सरासरीने ५१४ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल २०२५ मध्ये पाच अर्धशतके देखील झळकावली आहेत. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात त्याने १७१.९० च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या.
हेही वाचा : MI vs PBKS : पंजाबकडून पराभव तरी Hardik Pandya ची अकड कायम! पाच ट्रॉफी असल्याचा दाखवला घमंड, वाचा सविस्तर..
आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवुन दिला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने संथ गतीने फलंदाजी केल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला. पंजाबणने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 20 ओवर मध्ये १८४ धावा केल्या होत्या. पंजाबने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून विजय मिळवला.