हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
MI vs PBKS :आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यातआधी पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 20 ओवर मध्ये १८४ धावा केल्या होत्या. पंजाबने हे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून सहज विजय मिळवला. पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला. यासह, पंजाब किंग्जने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे. म्हणजे आता अय्यरच्या पंजाबला अंतिम सामन्यासाठी एक अतिरिक्त सामना खेळायला मिळणार आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सना आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित सामने जिंकावेच लागणार आहेत.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जसमोर १८४ धावा उभारल्या होत्या. प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिश यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने ९ चेंडू शिल्लक असताना सहज विजय मिळवला. त्याच वेळी, पंजाबविरुद्धच्या मानहाणीकरक पराभवानंतर देखील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या वेगळ्याच घमंडमध्ये दिसून आला.
सामन्यानंतरच्या सादरीकरणामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, ‘जशी विकेट होती, आम्ही २० धावांनी मागे राहिलो, असं होत असतं. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाच ट्रॉफी जिंकल्या असून ते नेहमीच कठीण राहिले आहे. आमची गोलंदाजी क्लिनिकल नव्हती. त्यांनी चांगला खेळ केला आणि फटके खेळले. आम्हाला फक्त पुढे चांगले क्रिकेट खेळायचे आहे.” असे हार्दिक म्हणला.
पंड्या पुढे म्हणाला की, ‘फलंदाजी गटासाठी योग्य टेम्पलेट शोधायचे असून आम्हाला फारशी भीती नाही. आम्हाला माहित होते की काय अडचणीचे आहे. चार दिवसांपूर्वीच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. ज्यामध्ये आम्ही स्वतःला परत शोधत आहोत.’
मुंबई इंडियन्स वाईट परिस्थित होता. तेव्हा सूर्यकुमार यादवने ५७ धावांची खेळी केली. यासह, त्याने आयपीएल २०२५ मधील त्याचे पाचवे अर्धशतक देखील पूर्ण केले. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार ठोकले. तसेच मुंबईचा दुसरा कोणताही फलंदाज अर्धशतकाच्या जवळपास देखील जाऊ शकला नाही. एमआयच्या पराभवाचे हे एक प्रमुख कारण राहिले आहे.
प्रियांश आर्यने मुंबई इंडियन्सविरुद्ध ३५ चेंडूत ६२ धावा चोपल्या आहेत. दुसरीकडे, जोश इंग्लिशने १७३ च्या स्ट्राईक रेटने ७३ धावा काढल्या. या दोन्ही फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सने दिलेला धावसंख्या सहज गाठली.