क्रिकेट(फोटो-सोशल मीडिया)
Embarrassing cricket records : क्रिकेट विश्वात दररोज कोणते ना कोणते विक्रम बनत असतात आणि मोडले देखील जाता असतात. काही विक्रम लक्षात ठेवण्यासारखे तकाही नकोसे असतात. या संदर्भात, क्रीडा जगतात एक आश्चर्यकारक स्कोअर कार्ड पाहायला मिळाल आहे. इंग्लंडमधील एका क्लबचा संघ फक्त २ धावांवर सर्वबाद होऊन माघारी परतला आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगच्या एका सामन्या दरम्यान, रिचमंड क्रिकेट क्लब फोर्थ इलेव्हनचा संपूर्ण संघ फक्त २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.
रिचमंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ लंडन क्रिकेट क्लबने ४५ षटकांत ६ गडी गमावून ४२६ धावा उभारल्या. नॉर्थ लंडनकडून सलामीवीर डॅन सिमन्सने १४० धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्याशिवाय, नबिल अब्राहम्सने ४२, झॅक लेविटने ४३, रॉबर्ट रेक्सवर्थीने ३६ आणि जेकब मॅटेजिकने ३६ धावा काढल्या. या काळात, नॉर्थ लंडन क्लबला अतिरिक्त धावा देऊन ९२ धावा देखील मिळाल्या. रिचमंडच्या गोलंदाजांकडून खूप वाईड आणि नो बॉल टाकण्यात आले.
Quite possibly the most unreal scorecard of the season is already guaranteed ⬇️
Thanks @morganbarrell and the half a dozen others who have shared with us this morning – not Premier League but couldn’t not post about it (sorry @Richmondcricket – let us know the story behind the… https://t.co/JZ8v40PXDX pic.twitter.com/oV2qy22KO0— The Premier League Cricket Club ™ (@TPLCricketClub) May 25, 2025
हेही वाचा : MI vs PBKS : पंजाबकडून पराभव तरी Hardik Pandya ची अकड कायम! पाच ट्रॉफी असल्याचा दाखवला घमंड, वाचा सविस्तर..
या ४२६ धावा या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रिचमंड क्रिकेट क्लब फोर्थ इलेव्हनचा संपूर्ण संघ ३४ चेंडूतच सर्वबाद झाला. १० फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात आले आणि फक्त एकाच फलंदाजाला खाते उघडता आले. त्याच्यासोबत नवीन चेंडू हाताळण्यासाठी आलेल्या मॅट रोसनने चमत्कार करत एकही धाव न देता ५ फलंदाजांना माघारी पाठवले. रिचमंड क्लबचे आठ फलंदाज खाते न उघडताच माघारी गेले. पेट्रीफाई व्यतिरिक्त, नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला रफिकुल हक एकही धाव न काढता नाबाद राहिला आहे.
रिचमंड क्रिकेट क्लबचा इतिहास खूप जुना आणि महान राहीला आहे. या क्लबची स्थापना १८६२ मध्ये झाली आहे. हा क्लब इंग्लिश काउंटी संघ मिडलसेक्सचे होम ग्राउंड देखील आहे, जिथे ते त्यांचे ट्वेंटी२० सामने खेळत असतात. इतकेच नाही तर, या क्लबमधून नुकताच बाहेर आलेला वंश जानी आता वारविकशायर काउंटी क्रिकेट क्लबचा महत्वाचा भाग बनला आहे. या क्लबची ओळख आणखी खास आहे कारण ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट देखील येथे खेळलेला आहे.