Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025  : ‘श्रेयस अय्यरचे श्रेय हिरावून घेतले..’, लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचा प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा.. 

आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज शानदार कामगिरी करताना दिसत आहे. याबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कार यांनी गौतम गंभीरवर काही गंभीर आरोप केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 20, 2025 | 10:11 AM
IPL 2025: 'Shreyas Iyer's credit was taken away..', Little Master Sunil Gavaskar targets coach Gautam Gambhir..

IPL 2025: 'Shreyas Iyer's credit was taken away..', Little Master Sunil Gavaskar targets coach Gautam Gambhir..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५  बीसीसीआयकडून स्थगित केल्यानंतर आता पुन्हा एकदा सुरू झाले आहे.  आतापर्यंत ६१  सामने खेळवण्यात आले आहेत. या आयपीएलमध्ये  श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज शानदार कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने १२ पैकी ८ सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सच्या विजयानंतर, जीटी, आरसीबीसह पंजाब किंग्जनेही प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला आहे.  यासोबतच श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची मोठ्या प्रमाणात क्रीडा विश्वात  खूप चर्चा रंगली आहे.

आयपीएल २०२४ मध्ये, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद आपल्या नावावर केले होते. अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाबला यावर्षी देखील विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. या संदर्भात, माजी क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर यांनी त्यांच्याबद्दल एक विधान केले आहे. तसेच त्यांनी यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा देखील साधला आहे.

हेही वाचा : RR vs CSK : तळाचे संघ आज आमनेसामने! चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणार प्रतिष्ठेची लढाई

सुनील गावस्कर यांचा गौतम गंभीरवर आरोप

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज प्लेऑफमध्ये पात्र ठरल्यानंतर सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना झाल्यानंतर  सुनील गावस्कर म्हणाले, “केकेआरमध्ये श्रेयस अय्यरचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्रेयसने संघाला चॅम्पियन बनवले. पण सर्व श्रेय गौतम गंभीरला देण्यात आले. ”

याचे श्रेय गौतमला गेले..

“हंगामाच्या सुरुवातीला गौतम गंभीर केकेआरमध्ये मेंटर म्हणून सामील झाला. आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर, संपूर्ण कथा गौतम गंभीरसाठी चालवण्यात आली. खर तर श्रेयस अय्यर त्यास पात्र होता. गेल्या हंगामात जेतेपद जिंकण्याचे श्रेय श्रेयस अय्यरला मिळाले नाही. सर्व श्रेय दुसऱ्याला देण्यात आले होते.” असे देखील गावस्कार म्हणाले.

हेही वाचा : India Pakistan War : भारताने २५ पाकिस्तानी खेळाडूंचे वाजवले बारा! ‘या’ मोठ्या स्टेडियमने घेतला टोकाचा निर्णय…

अय्यरला आयपीएल २०२५ मध्ये श्रेय मिळाले

सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, “कोणत्याही सामन्यात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. कोणीही शून्यावर बसून संघाला विजय मिळवून  देऊ शकत नाही. या वर्षी श्रेयस अय्यरला खऱ्या अर्थाने सर्व श्रेय मिळत आहे. यावेळी रिकी पॉन्टिंगने पंजाबला विजय मिळवून दिला असे कोणीही म्हणताना दिसत नाही.”

Web Title: Ipl 2025 shreyas iyers credit was taken away sunil gavaskar targets coach gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IPL 2025
  • Shreyas Iyer
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

रुग्णालयात दाखल श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट, ICU मधून बाहेर, बरे होण्यासाठी किती दिवस लागणार
1

रुग्णालयात दाखल श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट, ICU मधून बाहेर, बरे होण्यासाठी किती दिवस लागणार

श्रेयस अय्यरला मोठी दुखापत; अय्यरचे ‘हे’ ठरवता त्याला भारताचा स्टार खेळाडू; एकदा वाचाच
2

श्रेयस अय्यरला मोठी दुखापत; अय्यरचे ‘हे’ ठरवता त्याला भारताचा स्टार खेळाडू; एकदा वाचाच

‘त्यानंतर रोहित आणि विराटची..’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर कोच गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये केले मन मोकळे; पहा Video
3

‘त्यानंतर रोहित आणि विराटची..’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर कोच गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये केले मन मोकळे; पहा Video

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर
4

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.