फोटो सौजन्य - Star Sports सोशल मीडिया
सुनील गावस्कर : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा १८ वा सिझनचा ५३ वा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघामध्ये रंगणार आहे. या सीझनमध्ये संघाने अनेक नव्या संघानी या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आयपीएल २०२५ चा खिताब कोणता संघ जिंकेल? हा एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. या हंगामात चॅम्पियन बनण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार असलेल्या संघाचे नाव त्याने जाहीर केले आहे. सीझनच्या शेवटी कोणता संघ विजेतेपद जिंकेल हे गावस्कर यांनी सांगितले आहे.
गेल्या १७ हंगामांपासून जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या संघाचे नाव गावस्कर यांनी जाहीर केले आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून आरसीबी आहे, ज्याने आयपीएल २०२५ मध्ये अद्भुत खेळ दाखवला आहे. सुनील गावस्कर यांच्या मते, ‘या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वात मजबूत दावेदार आहे. या हंगामात आरसीबीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १० पैकी ७ सामने जिंकले आहेत. ते सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत.
इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, आरसीबीने या सीझनमध्ये उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवले आहे. विराट कोहली, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिकल आणि जोश हेझलवूड यांसारख्या खेळाडूंनी संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावस्कर यांनी हे देखील मान्य केले की, मागील सहा सामन्यांमध्ये सलग विजय मिळवणारा मुंबई इंडियन्स आरसीबीच्या ताकदीच्या जवळपास आहे, परंतु जेतेपदाच्या शर्यतीत आरसीबी थोडा पुढे आहे असे त्यांनी सांगितले. ‘आरसीबीची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिले आहे. मुंबई इंडियन्स जवळ आहे, पण आरसीबीकडे आघाडी आहे. प्रश्न असा आहे की ते ही गती कायम ठेवू शकतील का?
आयपीएल २०२५ मध्ये, आरसीबीने आतापर्यंत १० पैकी ७ सामने जिंकले आहेत, तर ३ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. संघाचे अजूनही चार गट फेरीचे सामने शिल्लक आहेत, त्यापैकी तीन त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील. घरच्या मैदानावरील रेकॉर्ड त्यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. ३ मे रोजी, म्हणजे आज, आरसीबीचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होईल, ज्याला त्यांनी पहिल्या सत्रात पराभूत केले होते. या वर्षी सीएसके आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहे, परंतु आरसीबीसाठी हा सामना प्लेऑफमधील त्यांचे स्थान मजबूत करण्याची संधी असेल.