फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
शुभमन गिलचा व्हिडीओ व्हायरल : गुजरात टायटन्स संघ आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी करत आहे. गुजरातने शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून चालू हंगामातील त्यांचा ७ वा विजय नोंदवला. या विजयासह गुजरात टायटन्सच्या संघाने पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादला विजयासाठी २२५ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु संघ २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १८६ धावाच करू शकला. या सामना शुभमन गिलच्या विकेटपासून वादग्रस्त राहिला आणि सध्या गुजरात टायटन्सचा कर्णधाराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शुभमन गिल हैदराबादविरुद्ध सामन्यात धावबाद झाला आणि या सामन्यात पंचांच्या निर्णयावरून वाद झाला, जिथे गुजरातचा कर्णधार शुभमन गिल मैदानाच्या मध्यभागी पंचांशी वाद घालताना दिसला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये देखील शुभमन गिल आणि पंचांचा वाद पाहायला पाहायला मिळाला.
कोहली-धोनीच्या शेवटच्या आयपीएल लढतीत पाऊस खलनायक ठरेल का? RCB vs CSK सामना वाया गेला तर…
खरंतर, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात झालेल्या सामन्यात, शुभमन गिलने दोन वेळा पंचांशी वाद घातला. पहिल्यांदाच तो स्वतः धावबाद झाला. ७६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तिसऱ्या पंचांनी त्याला धावबाद घोषित केले आणि या हंगामातील त्याचे पहिले शतक हुकल्याने तो संतापला. मैदानाबाहेर गेल्यानंतरही तो चौथ्या पंचांशी वाद घालताना पाहायला मिळाला या घटनेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Subman Gill and Abhishek Sharma Funny moments #Abhishek#GTvsSRH #Gill pic.twitter.com/dcahauyeO6
— The KALKI 🗡️ (@TheKalkispeaks) May 2, 2025
दुसऱ्यांदा त्याने १४ व्या षटकात पंचांशी वाद घातला. अभिषेकविरुद्ध तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर गिल संतापलेला दिसत होता आणि त्याने पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, गिल रागावलेला पाहून अभिषेक शर्माने स्वतः हस्तक्षेप केला आणि त्याला शांत करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गिल पंचांशी वाद घातल्यानंतर मैदानाच्या मध्यभागी अभिषेक शर्माला लाथ मारताना दिसत आहे. तथापि, हे दोन मित्रांमधील मजा आणि प्रेमाचे चांगले क्षण आहेत.
Another argument between Shubman Gill and the umpire.
– Abhishek Sharma calming down Gill. pic.twitter.com/sPQG0C0YGO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2025
आम्ही तुम्हाला सांगतो की दोघेही १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून एकत्र खेळले आहेत आणि दोघेही स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबकडून क्रिकेट खेळतात. यानंतर त्याने अभिषेकलाही लाथ मारली, ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. कालच्या सामन्यात अभिषेक शर्मा याने संघासाठी कमालीची खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. अभिषेकने गुजरात टायटन्सविरुद्ध ४१ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या.