आयपीएल २०२५ मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणारे खेळाडू.
हैदराबादच्या संघाने ईशान किशनला ११.२५ कोटींना विकत घेतले आहे. इशान किशनची कहाणीही वेगळी नाही. जरी त्याने शतकही केले असले तरी, तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. किशनने पाच इनिंगमध्ये एकेरी संख्येत धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad
दिल्ली कॅपिटल्सच्या जॅक फ्रेझर मॅकगर्क संघाने ९ कोटींना विकत घेतले होते. पण आयपीएल २०२४ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कसाठी हा हंगाम विसरण्यासारखा राहिला आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत पाच वेळा जॅक फ्रेझरने एकेरी अंकी धावसंख्येवर आपली विकेट गमावली आहे. सध्या त्याला संघाच्या प्लेइंग ११ मधून काढून टाकले आहे. फोटो सौजन्य - Delhi Capitals
या आयपीएलमध्ये जर कोणी सर्वात मोठा फ्लॉप स्टार असेल तर तो ग्लेन मॅक्सवेल आहे. हा स्फोटक ऑस्ट्रेलियन अष्टपैलू फलंदाज फलंदाजीने कोणताही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. तोही पाच डावांमध्ये एकेरी अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील २७ कोटींना विकत घेतले होते, मुंबई इंडियन्सविरुद्ध ऋषभ पंतला फक्त चार धावा करता आल्या. आयपीएल २०२५ मध्ये पंत सिंगल-डिजिट स्कोअरवर बाद होण्याची ही सहावी वेळ आहे. यासह त्याने सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. या सीझनमध्ये त्याची सातत्याने निराशाजनक कामगिरी राहिली आहे.
सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्माला १४ कोटींना विकत घेतले होते. अभिषेक शर्मा हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या हंगामात त्याने शतकही झळकावले आहे. पण यासोबतच तो पाच वेळा सिंगल डिजीटवरही बाद झाला आहे. फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad