Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs PBKS: ‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत…’ हताश हार्दिक पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी, मुंबईने केली निराशा

हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सकडून दारुण पराभव पत्करावा लागला, जो या हंगामातील त्यांचा सलग चौथा पराभव आहे. हार्दिक पांड्या यावेळी खूपच निराश आणि हताश दिसून आला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 17, 2026 | 12:27 PM
हार्दिकने स्वीकारली पराभवाची जबाबदारी (फोटो सौजन्य - Instagram)

हार्दिकने स्वीकारली पराभवाची जबाबदारी (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • हार्दिक पंड्या झाला निराश
  • मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव
  • पराभव लागला जिव्हारी स्वीकारली जबाबदारी 
IPL 2026 च्या २४ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला ७ गडी राखून पराभूत केले. या विजयामुळे पंजाब ९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या आयपीएलमधील मुंबईचा हा सलग चौथा पराभव होता. पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या निराश दिसला. सामन्यानंतरच्या सादरीकरण सोहळ्यात सामन्याबद्दल विचारले असता, हार्दिक म्हणाला की, सध्या त्याच्याकडे बोलण्यासारखे काही नाही.

पराभवानंतर एमआयचा कर्णधार हार्दिक निःशब्द

सामन्यानंतर प्रसारकाशी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “खरं सांगायचं तर, सध्या माझ्याकडे जास्त काही बोलण्यासारखं नाही. मला वाटतं की, आम्हाला खरोखरच मागे जाऊन आमच्या रणनीतीचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि आमच्याकडून कुठे चूक होत आहे हे पाहण्याची गरज आहे. ही चूक एका खेळाडूमुळे आहे का? संपूर्ण संघामुळे आहे का? की आमच्या नियोजनाच्या अभावामुळे आहे? आम्ही पुढच्या सामन्यापूर्वी हे शोधून काढू आणि पुढे काय करता येईल ते पाहू.”

सध्या मुंबई इंडियन्सची अवस्था खूपच खराब आहे. कारण सलग चार सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि बऱ्याच अंशी याचं खापर हार्दिक पंड्यावरही फुटत आहे. योग्य कप्तानी न केल्यामुळे हार्दिकला ट्रोल केले जात आहे.

बुम..बुम..बुमराहला कोणाची लागली नजर, Yorker King ची जादू का नाही चालली? लागोपाठ चार सामन्यात एकही विकेट नाही

पंजाबने सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी केली – हार्दिक

पांड्या पुढे म्हणाला, “मला वाटते की या विजयाचे श्रेय पंजाबला द्यायलाच हवे. चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला होता. दुसऱ्या डावात दव पडले होते, ज्यामुळे फलंदाजी करणे थोडे सोपे झाले, पण असे असूनही, त्यांनी आमच्यावर पूर्णपणे मात केली. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आणि निश्चितच क्षेत्ररक्षणही उत्तम केले. त्यामुळेच त्यांना विजय मिळाला. मला वाटते की आपल्याला काही कठीण निर्णय घेण्याची गरज आहे की आपण फक्त खेळत राहायचे आहे, हे पाहण्याची गरज आहे. आशा आहे की, येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही सुधारणा करू.”

डी कॉकचे शतक व्यर्थ ठरले

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, क्विंटन डी कॉकच्या शतकामुळे मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा केल्या. डी कॉकने ६० चेंडूंमध्ये ११२ धावांची नाबाद खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. पंजाबने १६.३ षटकांत ३ गडी गमावून १९८ धावा करत सहजपणे लक्ष्य गाठले. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने नाबाद ८० धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने ६६ धावांचे योगदान दिले.

वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले

Web Title: Ipl 2026 mi vs pbks hardik pandya accepts responsibility for defeat mumbai indians disappoints fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

RCB Vs GT Final Live: ई साला ‘पुन्हा’ कप नाम्दे! Virat Kohli समोर गुजरातचा पराभव; आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन
1

RCB Vs GT Final Live: ई साला ‘पुन्हा’ कप नाम्दे! Virat Kohli समोर गुजरातचा पराभव; आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन

GT Vs RCB Final Live: अंपायरचा ‘तो’ एक निर्णय आणि खेळ पलटला; Washington Sundar चा Video Viral
2

GT Vs RCB Final Live: अंपायरचा ‘तो’ एक निर्णय आणि खेळ पलटला; Washington Sundar चा Video Viral

RCB Vs GT Final Live: शुभमन, सुदर्शन फेल! आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं; बंगळुरूचा विजय निश्चित?
3

RCB Vs GT Final Live: शुभमन, सुदर्शन फेल! आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं; बंगळुरूचा विजय निश्चित?

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जिंकली ‘ऑरेंज कॅप’; गिल आणि सुदर्शन बाद होताच रचला नवा इतिहास
4

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जिंकली ‘ऑरेंज कॅप’; गिल आणि सुदर्शन बाद होताच रचला नवा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.