Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

IPL 2026 PlayOff Scenario: आयपीएल २०२६ च्या साखळी फेरीतील फक्त ४ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे कोणता संघ शेवटच्या जागेसाठी बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल .

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 22, 2026 | 06:03 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ?
  • 4 टीम्स अन् जागा 1
  • प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’
आयपीएलच्या २०२६ च्या हंगामात शर्यत आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. तीन संघांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला असून चौथ्या आणि अंतिम जागेसाठी चार संघांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी प्लेऑफमधील आपले स्थान मजबूत केले आहे. तर, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचे भवितव्य आता उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे. गुजरातने चेन्नईवर मोठा विजय मिळवत टॉप-2 मध्ये स्थान जवळपास पक्के केले, तर चेन्नई सुपर किंग्स अधिकृतपणे स्पर्धेबाहेर पडली आहे.

 

रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु सध्या १८ गुण आणि +१.०६५ च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानी आहे. चेन्नईविरुद्धच्या शानदार विजयामुळे गुजरात संघ १८ गुण +०.६९५ वर पोहोचला आहे. तर हैदराबाद संघ १६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हैदराबादचा पराभव करुन ते गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवू शकतात . हा विजय त्यांना २० गुणांपर्यंत नेईल आणि क्वालिफायर १ मधील त्यांचे स्थान निश्चित करेल.

Vinesh Phogat: WFI च्या भूमिकेवर न्यायालय नाराज; विनेश फोगाट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स सध्या चौथ्या स्थानाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. संघाने १३ सामन्यात १४ गुण मिळवले असून त्यांचा नेट रनरेटही चांगला आहे. राजस्थानचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यास राजस्थान थेट १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. जर राजस्थानला मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला, तर त्यांना इतर संघांच्या निकालांची वाट पाहावी लागेल.

पंजाब किंग्स

सलग पाच पराभव होऊनही, पंजाब किंग्स स्पर्धेत टिकून आहे. पंजाब किंग्सचा शेवटचा लीग सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेल्या एलएसजीवर विजय मिळवल्यास पंजाबला १५ गुण मिळतील. परंतु,क्वालिफाय होण्यासाठी जस्थानने पराभूत होणे आवश्यक आहे म्हणून मुंबईने राजस्थानला पराभूत करावे ही अशी आशा पंजाबला करावी लागेल. तसेच, कोलकात्याच्या निकालावरही पंजाबचे भवितव्य ठरेल. जर पंजाब जिंकला आणि राजस्थान हरला, तर नेट रनरेटचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे पंजाबला केवळ विजयच नव्हे तर मोठ्या फरकाने विजयाची गरज असू शकते.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्ससाठी पुढील सामना म्हणजे थेट नॉकआऊट सामनाच आहे. त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून पराभूत संघ जवळपास स्पर्धेबाहेर जाणार आहे. कोलकात्याने दिल्लीला हरवल्यास त्यांचे १५ गुण होतील. मात्र त्यानंतर त्यांना राजस्थान आणि पंजाब यांच्या पराभवाचीही अपेक्षा ठेवावी लागेल. जर राजस्थानने मुंबईवर विजय मिळवून १६ गुण गाठले, तर कोलकाताचा प्रवास संपुष्टात येईल. तसेच, जर अनेक संघ 15 गुणांवर पोहोचले, तर अंतिम निर्णय नेट रनरेटवर होईल. त्यामुळे KKR ला मोठ्या विजयाची आवश्यकता आहे.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सची परिस्थिती सर्वात कठीण मानली जात आहे. दिल्लीला कोलकात्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यानंतर राजस्थान आणि पंजाब या दोन्ही संघांनी पराभूत होणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर दिल्लीचा खराब नेट रनरेटही त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरत आहे.

प्लेऑफच्या अंतिम जागेसाठी स्पर्धा

आता उरलेल्या काही सामन्यांमुळे आयपीएल IPL 2026 मधील प्लेऑफचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. राजस्थानकडे सर्वात मोठी संधी आहे, पण पंजाब, कोलकाता आणि दिल्ली अजूनही शर्यतीत आहेत. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव आणि नेट रनरेट आता निर्णायक ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत रोमांचक असणार आहेत.

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

Web Title: Ipl 2026 playoff scenario race rajasthan punjab kkr delhi cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru

संबंधित बातम्या

IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा
1

IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…
2

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…
3

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या
4

RCB vs SRH: हैदराबादमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना, टॉप- २ साठी लढत; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.