Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: RCB ची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री, ३ स्पॉटसाठी ७ संघामध्ये चुरस; कोण मारणार बाजी?

IPL 2026 Playoff Scenario: आरसीबीची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्रीनंतर आता ३ जागांसाठी ७ संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणते संघ प्लेऑफच्या रेसमध्ये बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 18, 2026 | 04:11 PM
IPL 2026 Points Table (Photo Credit- X)

IPL 2026 Points Table (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • RCB ची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री
  • ३ स्पॉटसाठी ७ संघामध्ये चुरस
  • कोणते संघ मारणार बाजी?
इंडियन प्रिमियर लीग २०२६ आता निर्णायक आणि रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. लीग स्टेजमध्ये फक्त ८ सामने बाकी आहेत. तरीही प्लेऑफसाठी फक्त एकच संघ क्वालिफाय झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १३ पैकी ९ सामने जिंकून १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आरसीबी (RCB) प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करणारा पहिला संघ ठरला आहे. आता उर्वरित तीन जागांसाठी ७ संघासामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचे गणित बदलत आहे. यामुळे प्लेऑफच्या रेसमध्ये कोणते संघ क्वालिफाय करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

IPL 2026: धोनी IPL मधून रिटायरमेंट घेणार? हैदराबादविरुद्ध ‘थाला’ खेळणार शेवटचा सामना? माहिती आली समोर

कोणते संघ मारणार बाजी?

गुजरात टायटन्स – गुजरात टायटन्स (GT) संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. जर गुजरातने आपला शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जिंकला तर प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा दुसरा संघ बनेल. याशिवाय, जर सनरायझर्स हैदराबादने CSK ला हरवले किंवा लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सला हरवले, तर GT एकही सामना न खेळता क्वालिफाय करेल.

सनरायझर्स हैदराबाद – जर सनरायझर्स हैदराबादने (SRH) चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग मोकळा होईल. मात्र, जर ते चेन्नईविरुद्ध सामना हरले तर त्यांना आरसीबीविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. अशा परिस्थितीत शकतात नेट रन रेट महत्त्वाचा ठरू शकतो.

चेन्नई सुपर किंग्स – चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) आता प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असा झाला आहे. सीएसकेला सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांविरुद्ध विजय मिळवावा लागेल. १६ गुणांनंतरही त्यांचे भवितव्य इतर संघांच्या निकालांवर आणि नेट रन रेटवर अवलंबून असेल.

राजस्थान रॉयल्स – दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतरही, राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. जर त्यांनी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर ते १६ गुणांपर्यंत पोहोचतील. मात्र, जर सीएसके आणि एसआरएच हे संघही १६ गुणांपर्यंत पोहोचले, तर निर्णय नेट रन रेटवर अवलंबून असेल.

कोलकाता नाइट रायडर्स – कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) गुजरात टायटन्सवर विजय मिळवल्यानंतर ते अजूनही प्लेऑफच्या रेसमध्ये जिवंत आहेत. केकेआरने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी ते जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु, त्यांना आपला नेट रन रेटही टिकवून ठेवावा लागेल.

पंजाब किंग्स – पराभवाच्या सिक्सरमुळे पंजाब किंग्स (PBKS) आता अडचणीत सापडला आहे. एकेकाळी प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पंजाबला आता आपला शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. याशिवाय, इतर संघानी त्यांचे सामने गमवावेत अशी आशा करावी लागेल.

दिल्ली कॅपिटल्स – दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) विजयाने प्लेऑफच्या रेसमध्ये नवीन वळण आणले असले तरी त्यांची परिस्थिती सध्या कठीण दिसत आहे. दिल्ली जास्तीत जास्त केवळ १४ गुणांपर्यंतच पोहोचू शकतो. त्यांचा खराब नेट रन रेटमुळे त्यांचे प्लेऑफचे समीकरण बदलू शकते.

आरसीबी क्वालिफाय झाल्यामुळे सर्व संघावरील दबाव प्रचंड वाढला आहे. काही संघांचे भवितव्य त्यांच्याच हातात आहे, तर इतर संघाना इतर सामन्यांच्या निकालांची वाट पाहावी लागेल. हे आगामी ८ सामने प्लेऑफचे चित्र स्पष्ट करतील. त्यामुळे अनिश्चितताने भरलेल्या आयपीएल स्पर्धेत कोणते संघ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

CSK vs SRH: चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

Web Title: Ipl 2026 playoffs race rcb qualified csk srh gt playoff equation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • CSK vs SRH
  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.