एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील पिच गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. एकेकाळी फिरकी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरणारी खेळपट्टी आता फलंदाजीसाठी देखील अनुकूल मानली जाते. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही या खेळपट्टीवर फायदा होऊ शकतो. येथे खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या स्टेडियमवर एकूण ९७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ५० सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर ४७ सामने नाणेफेक गमावलेल्या संघाने जिंकले आहेत. या पिचवर सर्वाधिक धावसंख्या २४६/५ इतकी आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चेन्नईने १५, तर हैदराबादने ८ सामने जिंकले आहेत.
चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन
RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू






