
साहिबा अलीच्या व्हिडिओने खळबळ (फोटो सौजन्य - Instagram)
साहिबा बालीची पाकिस्तानची प्रशंसा
साहिबा बालीची आणखी एक जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ती तिच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल बोलत आहे. त्यात ती पाकिस्तानची प्रशंसा करताना दिसत आहे. साहिबा म्हणाली, “माझा डोळे उघडणारा पाकिस्तानचा दौरा होता. हे २००५ सालची गोष्ट आहे, जेव्हा मी किशोरवयीन होते. पाकिस्तानबद्दलची माझी धारणा मी मीडिया, चित्रपट आणि क्रिकेट सामन्यांमध्ये जे पाहिले होते त्यावर आधारित होती. जेव्हा मी तिथे गेले, तेव्हा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ते खूप प्रेमळ लोक आहेत. आम्ही भारतीय आहोत हे जाणून त्यांना खूप आनंद झाला होता.”
LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी
वाचा पोस्ट
Sahiba Bali says she went to Pakistan in 2005, The same year when, three synchronized bomb blasts hit Delhi markets killing 62 and India accused Pakistan of state-sponsored terror revival in collaborating with the LeT. Instead of condemning Pakistan, She went on and said “My… pic.twitter.com/Ma9H4vlUvi — Chota Don (@choga_don) March 30, 2026
सोशल मीडियावर खळबळ
साहिबा बालीची दोन्ही वक्तव्ये व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. बालीला सतत ट्रोल केले जात आहे. बीसीसीआयने तिला आयपीएलमधून काढून टाकावे, अशी मागणीही होत आहे. ठिकठिकाणी साहिबाचे मीम्स होत आहेत आणि याशिवाय तिचे पाकिस्तानबाबत असणारे विचार ऐकून त्वरीत आयपीएलमधून बाहेर काढण्यात यावे असंही अनेकांचे म्हणणे आहे.
साहिबा बालीचा काश्मीरशी काय आहे संबंध
साहिबा बालीचे वडील काश्मिरी शीख आहेत. तिचा जन्म कोलकाता येथे झाला. साहिबा अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये दिसली आहे. ती ‘लैला मजनू’ आणि ‘अमर सिंग चमकिला’मध्ये दिसली आहे. तिने ‘तनसाह’ या मालिकेतही भूमिका साकारली होती. आयपीएल व्यतिरिक्त, तिने ‘शार्क टँक इंडिया’चे सूत्रसंचालनही केले आहे. गेल्या सीझनमध्ये ती पंजाब किंग्ससोबत होती आणि तिने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अनेक स्टार खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या होत्या. साहिबाचे इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
LSG vs DC Pitch Report: लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व? पावसाचे सावट, कसा रंगणार सामना
Since Sahiba Bali is trending, here is another video of her, attacking The Kashmir Files. Bali thinks movies depicting the plight of Kashmiri Hindus is propaganda. What is wrong with BCCI? Why are they employing hardcore leftists? pic.twitter.com/48LPs1tHmB — Brutal Truth (@sarkarstix) March 30, 2026
प्रसिद्ध अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन सायरस ब्रोचा यांचा एक पॉडकास्ट पाहून मला आश्चर्य वाटले. त्यात ते साहिबा बालीची मुलाखत घेत होते, जी स्वतः एक काश्मिरी पंडित अभिनेत्री आहे. एक काश्मिरी पंडित म्हणून, मी त्या दोघांचाही निषेध करतो आणि माझ्या वंशसंहाराची व वांशिक निर्मूलनाची थट्टा आणि उपहास केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी करतो – अशोक पंडित – चित्रपट दिग्दर्शक