Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिन ॲलन Out की Not Out? दिग्वेश राठीच्या कॅचच्या Video ने सोशल मीडियावर नवा वाद; अंपायरिंगच्या निर्णयावर चाहत्यांचा संताप

लखनौच्या मुकुल चौधरीने खेळलेल्या वादळी खेळीमुळे केकेआरला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, या सामन्यानंतर लखनौच्या विजयापेक्षा मैदानातील खराब अंपायरिंगचीच चर्चा रंगली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 10, 2026 | 10:41 AM
फिन ॲलन Out की Not Out? दिग्वेश राठीच्या कॅचच्या Video ने सोशल मीडियावर नवा वाद (Photo Credit- X)

फिन ॲलन Out की Not Out? दिग्वेश राठीच्या कॅचच्या Video ने सोशल मीडियावर नवा वाद (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • फिन ॲलन Out की Not Out?
  • दिग्वेश राठीच्या कॅचच्या Video ने सोशल मीडियावर नवा वाद
  • अंपायरिंगच्या निर्णयावर चाहत्यांचा संताप
 Finn Allen Catch Out Controversy: आयपीएल 2026 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. लखनौच्या मुकुल चौधरीने खेळलेल्या वादळी खेळीमुळे केकेआरला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, या सामन्यानंतर लखनौच्या विजयापेक्षा मैदानातील खराब अंपायरिंगचीच चर्चा रंगली आहे. केकेआरचा सलामीवीर फिन ॲलन याला बाद ठरवण्याच्या निर्णयावर आता चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

फिन ॲलनच्या विकेटवरून ‘थर्ड अंपायर’ रडारवर

लखनौ सुपरजायंट्सकडून प्रिन्स यादव गोलंदाजी करत असताना फिन ॲलनने मोठा फटका मारला. सीमारेषेवर दिग्वेश राठीने एक अप्रतिम झेल टिपला. मात्र, हा झेल पकडताना दिग्वेशचा पाय बाउंड्री लाईनला स्पर्श करत असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे जाणवत होते. आश्चर्याची बाब म्हणजे, मैदानी अंपायरने याबाबत तिसऱ्या अंपायरची मदत न घेता थेट ॲलनला बाद ठरवले.

SKIED… AND TAKEN ON THE FENCE! 😱 Top edge from Allen, & Rathi pulls off a sharp catch at deep third 👏#TATAIPL 2026 | #KKRvLSG | LIVE NOW 👉 https://t.co/2ISFQDaiMT pic.twitter.com/kHnYWXKSh6 — Star Sports (@StarSportsIndia) April 9, 2026

या निर्णयानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी डेव्हिड मिलरच्या एका शॉटचा रिप्ले न दाखवता त्याला चौकार देण्यात आला होता, त्या वादाची वारा वाहतो की नाही वाहतो तोच फिन ॲलनसोबत ‘बेईमानी’ झाल्याचा आरोप फॅन्स करत आहेत.

IPL 2026 Points Table: पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! प्ले-ऑफच्या शर्यतीत 10 संघांची चुरस वाढली; पाहा कोण कुठे आहे?

KKR कडूनही मोठी चूक; ‘DRS’ का घेतला नाही?

अंपायरचा निर्णय वादग्रस्त वाटत असतानाही कोलकाता नाईट रायडर्सच्या संघ व्यवस्थापनाकडून आणि फलंदाजाकडून ‘डीआरएस’ (DRS) घेण्याबाबत हालचाल झाली नाही. मैदानात अंपायरने दिलेला निर्णय बदलण्यासाठी केकेआरकडे रिव्ह्यूचा पर्याय उपलब्ध होता, मात्र तो न वापरल्याने आता संघाच्या रणनीतीवरही टीका होत आहे. तांत्रिक चुका आणि अंपायरचा अविश्वासू निर्णय यामुळे केकेआरला महत्त्वपूर्ण विकेट गमवावी लागली.

2 कोटींचा ‘फ्लॉप शो’; फिन ॲलनच्या जागी बदलाची शक्यता?

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज फिन ॲलनला केकेआरने 2 कोटींच्या बोलीवर संघात स्थान दिले होते. टी-20 विश्वचषकात वादळी फलंदाजी करणाऱ्या ॲलनला आयपीएलमध्ये मात्र अद्याप सूर गवसलेला नाही. आतापर्यंतच्या 4 सामन्यांत त्याने केवळ 80 धावा केल्या आहेत. केकेआरच्या ताफ्यात टिम सीफर्टसारखा अनुभवी आणि आक्रमक फलंदाज बेंचवर बसून आहे. त्यामुळे सलग पराभवांनंतर केकेआर व्यवस्थापन फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करून सीफर्टला संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या गुणतालिकेत केकेआरची अवस्था बिकट असून त्यांना पुनरागमनासाठी एका मोठ्या विजयाची प्रतीक्षा आहे.

IPL मध्ये पुन्हा Fixing चे भूत? गुजरातविरुद्ध दिल्ली मुद्दाम हरली? आरोपांमागचं नेमकं सत्य काय?

Web Title: Ipl 2026 umpiring controversy digvesh rathi catch finn allen out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Finn Allen
  • IPL 2026
  • KKR vs LSG

संबंधित बातम्या

IPL Trophy History: आयपीएलच्या चमचमात्या ट्रॉफीवर लिहिलेल्या ‘त्या’ संस्कृत श्लोकाचा अर्थ माहीत आहे का? जाणून घ्या रंजक इतिहास
1

IPL Trophy History: आयपीएलच्या चमचमात्या ट्रॉफीवर लिहिलेल्या ‘त्या’ संस्कृत श्लोकाचा अर्थ माहीत आहे का? जाणून घ्या रंजक इतिहास

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स
2

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स

IPL Final 2026:  IPL 2026 च्या फायनलमध्ये रंगणार सुरांची मैफल! कैलाश खेर यांच्यासह दिग्गज गायक वाढवणार खेळाडूंचा उत्साह
3

IPL Final 2026: IPL 2026 च्या फायनलमध्ये रंगणार सुरांची मैफल! कैलाश खेर यांच्यासह दिग्गज गायक वाढवणार खेळाडूंचा उत्साह

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार!  विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी
4

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार! विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.